Top News : प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांची नवी आघाडी, जैन,मुस्लिम,ओबीसी,भटके-विमुक्तांना उमेदवारी

TEAM BRIEFNEWSBOOK
By -

प्रकाश आंबेडकर आणि जरांगे नवी आघाडी बनवणार

 prakash Ambedkar, Loksabha Election 2024 :

अकोला - महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये (Maharashtra Politics) नवी बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (prakash Ambedkar) यांनी डायरेक्ट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj jarange) यांच्यासह नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद बोलावून, नवीन आघाडीची घोषणा केली आहे. मात्र त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत आघाडी केल्याने वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे जाहीर संकेत दिले.


वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूरमधील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी सांगलीमधून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर नागपूरमध्ये वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यामधील ७ जागांसाठी उमेदवारांची घोषणाही केली आहे. रामटेक येथील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळी होईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.


वंचितचे सर्वेसर्वा आंबेडकर यांनी एकूण ७ जागांवर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र, जरांगे त्यांच्या उमेदवारांबद्दल ३० मार्चनंतर निर्णय घेतील असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.




पत्रकार परिषदेत आंबेडकर काय म्हणाले

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हटले की, काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यामध्ये काही निर्णय झाले. तर काल रात्री मी मनोज जरांगे यांना भेटलो. त्यावेळी आमची विस्ताराने चर्चा झाली. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे. यात जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गामधील असणार आहेत. पहिल्या टप्प्यामधील उमेदवारांना जरांगेंचे समर्थन असणार आहे. जरांगे त्यांची अंतिम भूमिका ३० तारखेला घेतील. जरांगेंनी ३० पर्यंत थांबण्याची विनंती केली आहे. त्यांची ती विनंती मान्य केली. जरांगे आणि मी दोघे मिळून लढणार आहे.


सर्वसामान्य लोकांना आता परिवर्तन हवं आहे. तर नवी आघाडी करताना आमच्यावर टीका होईल, आरोप केले जातील. शेती, किमान आधारभूत मूल्य, कृषी आधारित उद्योग हे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जावू. मनोज जरांगे सोबतची नवी मैत्री ही सामाजिक गठबंधन आहे, हे लोकं स्वीकारतील. ओबीसींना आतापर्यंत खूप कमी वाटा मिळालेला आहे. ओबीसी, भटके-विमुक्तांना अधिकाधिक उमेदवारी देणार आहे. भाजपने मुस्लिमांना वेगळे पाडण्याचे जे राजकारण सुरू केले त्याला उत्तर म्हणून आम्ही मुस्लिम उमेदवार देणार. तसेच जैनांना देखील प्रतिनिधित्व देणार, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.


ही आता राजकारणातील नवी वाटचाल आहे. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल. राजकारण आणि निवडणुकीत प्रचंड पैशांचा वापर. यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी मतदारांसोबत न राहता डोनेशन देणाऱ्यांसोबत राहते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चाने प्रचार करावा. कमीत कमी पैशामध्ये उमेदवाराने निवडणूक लढवावी हा प्रयत्न, असं आंबेडकर म्हटले.


वंचितने पहिली उमेदवार यादी जाहीर केली

१) भंडारा-गोंदिया : संजय केवट

२) गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी

३) चंद्रपूर : राजेश बेले

४) बुलढाणा : वसंतराव मगर

५) अकोला : प्रकाश आंबेडकर

६) अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान

७) वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके

८) यवतमाळ-वाशिम : खेमसिंह पवार