भारतीयांचे पाच अद्भुत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, कोन-कोणते विक्रम नोंदवले ती यादी पहा !

TEAM BRIEFNEWSBOOK
By -


गिनीज बुकमध्ये आपले नाव यावे असे अनेकांचे स्वप्न असते. त्याकरता बरेच लोकं काहीतरी भन्नाट वेगळं किंवा भव्य करण्याची धडपड करत असतात. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड तेही आपल्या सोशल मीडियाद्वारे सतत अशा विक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. मात्र मागच्या वर्षी म्हणजे २०२३ ला गिनीज बुकमध्ये अनेक विक्रम बनवण्यात किंवा मोडण्यामध्ये भारतीयांचा नंबर पुढे होता. हे पाच विक्रम कोणते आणि कोणत्या प्रकारचे ते नक्की पहाच.

१.भारतीयांचे पाच अद्भुत जागतिक विक्रम -

आपल्या देशामध्ये वर्षानुवर्षे केला जाणारा योगा आता पाश्चिमात्य देशांना देखील आवडायला लागला आहे. इतर देशांमध्ये ही तंदुरुस्त राहण्यासाठी योगासने विशेष म्हणजे सूर्यनमस्कार करण्याची पद्धत सुरू झाली आहे. गुजरातमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार करून जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे. ते सामूहिक सूर्यनमस्कार करण्यासाठी १०८ ठिकाणांहून एकूणच ४ हजार योगाप्रेमींनी उपस्थित दर्शवली होती. त्याची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून फोटो शेअर केला आहे.

२. रॉड डोक्यावर वाकवण्याचा विक्रम -

विस्पय खारदी यांनी आपल्या डोक्यावर एक मिनिटामध्ये तब्बल २४ लोखंडी रॉड वाकवण्याचा जागतिक विक्रम नोंदवत गिनीज बुकमध्ये नाव कोरले आहे. त्या विक्रमाचा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे.

३. पत्त्यांचा बंगला बनवण्याचा विक्रम -

लहानपणी पत्ते खेळताना आपण मजा म्हणून पत्ते एकमेकांना लावून किमान एक माळेचा तरी बंगला बनवण्याचा प्रयत्न करत असू तेव्हा अनेक प्रयत्नानंतर कधीतरी त्यामध्ये आपनाला यश मिळालं असेल. परंतु १५ वर्षांच्या अर्णव दागा या मुलाने तब्बल १ लाख ४३ हजार पत्त्यांचा वापर करून सिटी ऑफ जॉय (City of joy) या जागेची भव्य प्रतिकृती बांधली आहे. यामध्ये त्याने लेखकाची इमारत, शाहिद मिनार, सॉल्ट लेक स्टेडियम, संत पोल्सचे मुख्य चर्च बनवले आहे.

४. लांब केसांचा विक्रम -

अनेक महिलांचे लांबलचक केस असतात. परंतु तरुण मुलाचे सर्वात लांब केस असण्याचा हा जागतिक विक्रम १५ वर्षांच्या सिदकदीप सिंग चहल या मुलाच्या नावावर झाला आहे. त्या मुलाचे केस १३० सेंटिमीटर इतके लांब आहे.

५. दिल्लीच्या सर्व मेट्रो स्थानकांवर प्रवास करण्याचा विक्रम -

द्वारकामधील फ्रीलान्सर संशोधक शशांक मानू यांनी दिल्लीतील सर्व मेट्रो स्थानकांवर प्रवास करण्याचा अतिशय अद्भुत असा विक्रम नोंदवला आहे. त्याने १५ तास २२ मिनिटे आणि ४९ सेकंदा त दिल्ली मेट्रोच्या १२ लाइन्सवरच्या २८६ स्थानकांवर प्रवास केला आणि गिनीज बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.