Dhruv Jurel Replaced Ishan Kishan - बीसीसीआयने आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या २ कसोटीसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. त्या संघामध्ये इशान किशनच्या जागेवर २२ वर्षांच्या ध्रुव जुरेलची विकेटकीपर म्हणून निवड केली आहे. केसी भरतनंतर तो अतिरिक्त विकेटकीपर आहे.
इशान किशनने तात्पुरता ब्रेक घेतला आहे. आता त्याच्या जागी ध्रुव जुरेल घेणार पण हा नक्की आहे तरी कोण असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला असेलच. ध्रुव जुरेल हा २०२० च्या १९ वर्षाखालील वर्डकपमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार होता. भारतीय संघ २५ जानेवारी पासून इंग्लंडबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर ध्रुव जुरेल त्या मालिकांमध्ये कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे.
जुरेल हा नुकताच रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्याने २०२२ ला उत्तरप्रदेश मधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रणजी ट्रॉफीत विदर्भविरुद्ध त्याने पहिला सामना खेळला होता. जुरेलने प्रथम श्रेणी सामन्यामध्ये ७९० धावा केल्या आहे. त्यामध्ये त्याने एक शतक आणि ५ अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने प्रथम श्रेणीत आजवर २४९ धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. जुरेल याने १० लिस्ट A सामने आणि 23 टी, २०सामने खेळले आहे.
आयपीएल २०२२ ला लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सने जुरेलला २० लाख रुपये बेस प्राईसला आपल्या संघामध्ये सामील करून घेतले होते. त्याने २०२३ ला हंगामात आयपीएल पदार्पण केले. त्याने १३ सामन्यांमध्ये १७२.७२ च्या स्ट्राइक रेटने १५२ धावा केल्या आहे.
शाळेपासून क्रिकेटमध्ये उत्तर खेळी
जुरेलने त्याच्या क्रिकेटचा प्रवास हा शाळेपासून सुरू केला. दुसऱ्या मुलांना क्रिकेट खेळताना पाहून तो देखील क्रिकेटकडं आकर्षित झाला होता. समर कॅम्प पासून सुरुवात करून जुरेलने एक एक पायरी चढत आता थेट भारतीय संघात प्रवेश मिळवला आहे.
परिस्थिती बेताची असूनही घरच्यांची साथ
जुरेलच्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. पण तरीही घरच्यांनी ध्रुवच्या क्रिकेट खेळण्याला पाठबळ दिलं. त्यासाठी जुरेलच्या आईने ज्वेलरी विकण्याचा व्यवसाय देखील केला आहे. त्या पैशांमधून जुरेलसाठी क्रिकेटचे साहित्य विकत घेण्यात आले.
१९ वर्षाखालील भारतीय संघाचे उपकर्णधारपदी निवड
ध्रुव हा २०२० मध्ये १९ वर्षाखालील वर्डकपमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार होता. भारतीय संघ २०२० ला अंतिम फेरीत पोहचला होता. त्यावेळी जुरेलनेही फार मोठे योगदान दिले होते.
प्रथम श्रेणी पदार्पण
जुरेलने उत्तरप्रदेश मधून खेळताना १७ फेब्रुवारी २०२० ला विदर्भ विरुध्द रजणी पदार्पण केले. त्याने १९ डावांमध्ये ७९० धावा केल्या आहे. तसेच त्याने नागालँडविरूद्ध २४९ धावांची द्विशतकी उत्तम खेळी केली आहे.