संसद सुरक्षा प्रकरणात दिल्ली पोलिसांचे महत्त्वाचे पाऊल,आता आरोपी लवकर बोलणार

TEAM BRIEFNEWSBOOK
By -


 दिल्ली - संसदेची सुरक्षा (parliament security) कवच भेदल्याच्या प्रकरणातील आरोपींची पॉलिग्राफी टेस्ट करण्याची तयारी दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे. त्याकरता पतियाळा न्यायालयात अर्ज दाखल करून न्यायालयाची परवानगी मागण्यात आली आहे.

सध्या या प्रमाणातील सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून न्यायालय पॉलिग्राफ टेस्टच्या संदर्भात येत्या २ जानेवारीला आपला निर्णय देणार आहे.

दरम्यान आरोपींना त्यांच्या कुटुंबातील कोत्याही सदस्यांशी चर्चा करायची असेल तर त्यासाठी त्यांना अर्ज सादर करावा लागेल असे न्यायालयाने म्हटले आहे.

३१ डिसेंबरला संसदेचे कामकाज चालू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन युवकांनी लोकसभेचे कामकाज चालू असतानाच सभागृहामध्ये उडी मारली होती आणि पिवळ्या रंगाच्या स्मोक कँडलने सभागृहात धूर सोडला होता.

त्याचवेळी एक महिलेसोबत अन्य दोन आरोपींनी सभागृहाच्या बाहेर असाच प्रकार केला होता. देशातील सगळ्यात सुरक्षित वास्तू मानल्या जाणाऱ्या संसद भवनामध्येच हा गंभीर घडल्यामुळे सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे.

सरकारच्या दृष्टीने ही नामुष्कीची घटना घडली आहे. मात्र या प्रकरणाशी संबंधित काही जणांना अटक करण्यात आली असली तरी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जात आहे.