Health Tips - दारूचा यकृतावर प्रत्येक्षात परिणाम होत असतो. दारू डायरेक्ट पोहचते ती यकृतामध्ये म्हणजे लिव्हरपर्यंत. अल्कोहोलचे म्हणजे दारूचे ९० टक्के विघटन हे लिव्हरमध्ये होत असते. त्यामुळे तुम्ही जेवढ्या प्रमाणात दारूचे पित जाता, तेवढाच ताण यकृतावर म्हणजे लिव्हरवर होत असतो. त्या कारणाने यकृत लवकर निकामी होऊ लागते. तुमच्या यकृताला दारूमुळे पटकन हानी पोहचू शकते. त्यामुळे त्याचा परिणाम त्वरित यकृतावर म्हणजेच लिव्हरवर झालेला दिसतो.
विषारी पदार्थ कोन नष्ट करतं -
यकृत शरीरामधील विषारी पदार्थांना संपवण्याचे काम करत असते. त्यामुळे यात अल्कोहोलचा देखील समावेश आहे. जेव्हा तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असता तेव्हा यकृतात असणारे विविध प्रकारचे एन्झाइम ते खंडित करण्यास सुरुवात करतात. ज्यामुळे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम करते. यकृत शरीरामधील विषारी पदार्थ नष्ट करण्याचे काम करत असतो. त्यामध्ये अल्कोहोलचाही समावेश आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या यकृताच्या क्षमतेपेक्षा जास्त अल्कोहोल पिता तेव्हा त्याचा यकृतावर म्हणजेच लिव्हरवर विपरीत परिणाम होत असतो.
दारूचे शरीरावरील परिणाम -
◆ मानसिक स्थिती ढासळायला लागते.
◆ उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो.
◆ शारीरिक असंतुलन होते.
◆ सतत भीती वाटणे.
◆ दारू पिऊन बेशुद्ध पडणे.
◆ हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे.
◆ अति घाम येणे.
यकृताच्या आजाराची लक्षणे -
● यकृतावर सूज येणे.
● थकवा जाणवणे.
● वजन कमी होणे.
● भूक न लागणे.
● मळमळ होणे, उलट्या होणे.
यकृताचे आरोग्य कसे वाढवायचे -
निरोगी आहार : यकृताच्या आरोग्याला चालना देण्यासाठी, तुम्ही ताज्या गोष्टी, संपूर्ण धान्य, प्रथिने आणि उच्च साखर, अस्वास्थ्यकर चरबी आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट मर्यादित प्रमाणावर वापरणे,
वजन नियंत्रत करणे : लठ्ठपणामुळे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा धोका लक्षणीय वाढत जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे वजन रोखणे आवश्यक आहे.
नियमित आरोग्य तपासणी : नियमित आरोग्य तपासणी करून तुम्ही कोणताही आजार वेळेपूर्वी शोधू शकता. जर तुम्हाला अल्कोहोलशी संबंधित यकृत रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जावा.
संतुलित आहार घ्यावा : निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. यकृत निरोगी आणि मजबूत होण्यासाठी दररोज व्यायाम करणे अतिशय उत्तम आहे. यकृताला जे आजार झाले आहे, ते स्वतः यकृत दुरुस्त करून घेऊ शकतो. काही औषधांमुळे यकृताला इजा झाली असेल तर मुख्य म्हणजे दारूचे सेवन बंद केले पाहिजे. स्वतःच शरीर हे यकृताला बाधक ठरते. स्टिरॉइड किंवा इतर औषधे घेऊन यकृताचे होणारे नुकसान थांबवू शकतो, असं यकृतज्ज्ञ डॉ. सुहास थोरात यांचे म्हणने आहे.