रोहित पवारांनी बागेश्वर बाबा आणि कालीचरण महाराजांच्या वक्तव्याचा घेतला समाचार !

TEAM BRIEFNEWSBOOK
By -


 

धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येताना दिसतात. तर दुसरीकडे कालीचरण महाराजही त्यांच्या वादग्रस्त विधनांनी नेहमीच प्रकाश झोतात असतात. कालीचरण महाराजांनी काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यासोबतच आज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, साईबाबा हे संत होऊ शकतात, ते फकीर होऊ शकतात पण ते देव होऊ शकत नाहीत. गिधाडचं चामडं पांघरून कोणी सिंह होतं नाही. त्यामुळे आता नवीन वाद उफाळण्याची शक्यता दिसतं आहे. यामुळे आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि कालीचरण महाराजांनी केलेल्या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी समाचार घेतला आहे.





रोहित पवार काय म्हणाले ?

धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि कालीचरण महाराज यांच्यावर रोहित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, भोंदूबाबांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गांधींना नष्ट कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकतं नाही. कारण गांधी हा विचार जगात अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एक मोठया राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंमत असेल तर, भोंदूनच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा त्यांनी अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवावे. असे आव्हान त्यांनी भाजपा सरकारला केले आहे.
पुढे ते म्हणाले की, निवडणूका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधानं करायला लावायची. जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा. नको त्या विषयांवर चर्चा घडवायची. मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवायच आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचं पहिल्यापासून धोरण राहिलंय. पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षातून बाहेर यावं. त्यांनी बेरोजगारी,ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व अर्थव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोकं विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावीत. असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.