विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने आयोजित विचारवेध संमेलनातील दुसऱ्या दिनी सत्रात रविवारी सकाळी गांधी भवनमध्ये प्रारंभ झाला आहे. त्यावेळी डॉ. पुनयानी बोलत होते. पहिल्या दिवसातील सत्रामध्ये (शनिवार) जेष्ठ पत्रकार योगेंद्र यादव यांनी मार्गदर्शन केले होते. त्या संमेलनामध्ये 'भारत जोडो' आंदोलनाच्या वतीने निरंजन टकले यांच्या हस्ते सावित्रीच्या लेकी पुरस्कार मंगला पाटील, अरुंधती गडाळे, प्रतिभा भोसले, त्रिवेणी गव्हाळे यांना देण्यात आला आहे. त्यावेळी व्यासपीठावर आनंद करंदीकर आणि हरीश सदानी उपस्थित होते.
" धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जात आहे. संघाच्या शाखेपासून मीडिया पर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहे. प्रत्येक्षात भारत हा विविधतेमध्ये आनंद मानणारा देश आहे. भातामध्ये परदेशांतून विविध लोकं येत राहिले आहे. भारतील स्वतत्र्य लढ्यामध्ये हिंदू-मुस्लिम आणि इतर सर्व जण एकत्र लढत होते. धर्माच्या नावावर लढणारे ते स्वतत्र्य लढ्यामध्ये नव्हतेच. आपण मिळवलेले स्वतत्र्य आपल्याला जपायचे आहे. त्यामुळे यापुढे संवैधानिक मूल्य रक्षणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे." असे डॉ. पुनयानी म्हणाले.
पुढे डॉ. पुनयानी म्हणाले, आधीच्या लढाया टोळ्यांमधील, राजा राजांमधील, सत्तांमधील असायच्या तरी देखील आज तो इतिहास बदलताना त्यांना हिंदू-मुस्लिम लढ्याचं रूप दिल जात आहे. बीजेपी सत्तेवर आल्यापासून हे प्रयत्न अधिक वाढले आहे. या लढ्यांकडे धर्मांच्या चष्म्यातून पाहिल जात आहे. ईर्षा वाढविण्यासाठी हा प्रचार केला जात आहे. भारतीय संस्कृती ही बंधूभाव, सद्धभाव मानणारी मिली जुली अशी संस्कृती आहे. भारतीय आणि भारताबाहेरचा पदार्थांचा मिलाफ झालेला आहे. अनेक शब्द पेहराव इथे स्वीकारले आहे. हिंदी चित्रपटामधील सुंदर भजने लिहीणाऱ्या, गाणाऱ्या नावांमध्ये मुस्लिम गायक कलाकार आहे. त्यांना देखील आपण भारतीय म्हणूनच ओळखतो.