Ashish Shelar - मुंबईच्या नालेसफाईच्या कारणावरून आमदार आशिष शेलारांची ठाकरेंवर तोफ धडाडली

TEAM BRIEFNEWSBOOK
By -

मुबंईतील नाल्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी आशिष शेलार दुसऱ्यादिवशी दहिसर नदीला दाखल


मुंबई - पश्चिम उपनगरामधील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुबंई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई आतापर्यंत समाधानकारक झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. उद्धव ठाकरे कुठे आहेत ? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का ? असा प्रश्न आशिष शेलार यांनी केला.


मुबंईमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने दुसऱ्याच दिवसापासून आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी गजधरबांध परिसरातील नाल्यांची पाहणी केली. तर काल पश्चिम उपनगरातील अंधेरी, वर्सोवा येथील नाल्यांची पाहणी केल्यानंतर आज त्यांनी वळणई नाला लिंक रोड मालाड, अवधूत नगर नाला दहिसर एन. एल कॉम्प्लेक्स जवळील नाला व दहिसर नदीची पाहणी केली.


यादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, आम्ही नालेसफाईच्या कामाची पाहणी करतोय. जी आकडेवारी पालिका सांगतेय आणि प्रत्येक्ष चित्र यामध्ये तफावत आहे. ९५ टक्के सफाईचा दावा वडनई नाल्याचा केला जातोय. पण प्रत्येक्षात अद्याप गाळ नाल्यातून काढण्यात येतो आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली त्याचे स्वागत करीत आशिष शेलार म्हणाले की, एकनाथ शिंदे हे जबाबदार मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी मुबंईकरांची काळजी केली. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या रूपाने बेजबाबदार मुख्यमंत्री मुबंईकरांनी पाहिला आहे. ते घरी बसून नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत होते.


मर्दांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उद्धव ठाकरे कुठे आहेत ? इथे नाल्यावर मर्दुमकी का दाखवत नाही, ते लंडनच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत का ? असा खोचक प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी ठाकरेंना केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक आमदार, नगरसेवक, उत्तर मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, भाजपा पदाधिकारी आणि पालिका अधिकारी सहभागी झाले होते.

नवीन स्मार्टफोन 5G one plus घेण्यासाठी क्लिक करा.