![]() |
संजय सिंग यांना जामीन मंजूर |
नेमके प्रकरण काय ?
२०२१-२०२२ ला दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉड्रिंगच्या चौकशीबाबत राज्यसभा खासदार संजय सिंग यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये ईडीने अटक केलं होत. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नंतर आता त्या प्रकरणाशी संबंधित प्रकरणामध्ये संजय सिंग यांना अटक झाली होती.
तर सुप्रीम कोर्टात संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. खडपीठाने ईडीला विचारले होते की, संजय सिंग यांना अजूनही तुरुंगात ठेवण्याची गरज आहे का आहे.
संजय सिंग यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, मनी लॉड्रिंग असल्याची कोणतीही स्पष्टता सिद्ध झाली नाही आणि मनी लॉड्रिंग ट्रेलही सापडलेला नाही. तरी देखील संजय सिंग यांना ६ महिन्यांपासून तुरुंगामध्ये ठेवले आहे. अखेर आज (ता.२ मंगळवारी) ईडीने त्यांच्या जामीनाला विरोध केला नाही. यामुळे संजय सिंग यांना कोर्टाकडून जमीन मंजूर झाला आहे.
मद्य धोरण प्रकरणामध्ये आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. सध्या ते तिहार जेलमध्ये आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम आदमी पक्षाचे अजून काही नेत्यांना अटक होईल, याची त्यांना भीती असल्याचे मंत्री आतिशी यांनी सांगितले आहे.