भारतीय शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे ज्यांचे बजेट कमी आहे अशा लहान शेतकऱ्यांसाठी शेती सुलभ-सुखकर आणि सोपी करण्यासाठी Biketor Agro कंपनीने हा मिनी ट्रॅक्टर तयार केला आहे. साधारणपणे शेतकरी शेतामध्ये नांगरणी आणि पेरणीची कामे ट्रॅक्टरच्या मदतीने करतात. मात्र चांगले आणि महागडे ट्रॅक्टर घेणे शेतकऱ्यांसाठी झोपे नाही. त्या सर्व शेतकऱ्यांसाठी 'आशा बाईकटर' हा एक उत्तम पर्याय आहे.
तुम्ही कोणत्याही १५० सीसी मोटारसायकल सोबत आशा बाईकटरचा वापर करू शकता. शेतकरी हार्वेस्टर, पेरणी यंत्र, स्प्रेअर, ट्रॉली आणि रोटाव्हेटर यांच्या सारखी महत्त्वाची शेती यंत्रे जोडू शकतात. शेतात ते वापरू शकतात. त्यासोबत शेतकरी शेतात पाण्याचा पंप लावून सिंचन करू शकतो.
आशा बाईकटर मोटारसायकलवर चालत असल्याने शेतकऱ्यांना त्याच्या वापरासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करण्याची गरज नाही लागत. ते वापरणे आणि देखभाल करणेही झोपे आहे. त्यामुळे सर्व शेतकरी याचा वापर करू शकतात. आशा बाईकटर शेतकऱ्यांना वेगवेळी शेतीची कामे सहजपणे करण्यास मदत करतो. शेतकरी याचा वापर पेरणी, खते, सिंचन, फवारणी, खुरपणी, कापणी आणि वाहतुकीसाठी करू शकतात.
त्याचे फायदे -
● याच्या सहाय्याने शेतकरी ५०० किलोपर्यंतचा भार सहज उचलू शकतो.
● ग्राउंड क्लीयरन्स ३०० मिमी असल्याने शेतकरी पिकांचे नुकसान न करता सहजपणे ते वापरू शकतात.
● आशा बाईकटरच्या सतत वापराने शेतकरी त्यांच्या शेतीवरच खर्च ६० टक्के पर्यंत कमी करू शकतात.
● बाईकटरचा वापर करण्याचा एक असा फायदा होईल, शेतकरी नंतरदेखील नियमितपणे मोटारसायकल वापरू शकतात.
● कमाल वेग १०-१५ किमी/तास आहे. १५० सीसी ते ३५० सीसी पर्यंतच्या मोटारसायकलसोबत काम करू शकते.
● ऊन आणि पाऊसापासून संरक्षण करण्यासाठी बाईकटर वरून झाकलेला आहे. तर समोर, मागे आणि बाजूला पिटीओची सुविधा आहे.
त्याची किंमत किती ?
आशा बाईकटरची भारतामध्ये किंमत २,५०,००० आता महाराष्ट्रात उपलब्ध आहे. मात्र डीलर नेटवर्कच्या सहाय्याने ते भारतातील इतरही राज्यांमध्ये सुद्धा उपलब्ध होईल. आशा बाईकटर हा एक उत्तम मजबूत मिनी ट्रॅक्टर आहे, तो शेतकऱ्यांनसाठी शेती करणे सोपे करेल आणि त्यांचे खूप पैसे वाचवेल.