ICC समोर रिझवानच्या विकेटचा वाद मांडणार; पाकिस्तान क्रिकेट बोर्ड

TEAM BRIEFNEWSBOOK
By -


Mohammad Rizwan Pak vs Aus 2nd Test - पाकिस्तानचा संघ आता आस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिथे त्यांची पहिल्या दोन कसोटीमध्ये कशी फजिती झाली ते कोणापासून लपलेलं नाही. मात्र आणखी एक बाब दिसून आली. पाकिस्तानला आपला पराभव सहजासहजी स्विकारता येत नाही असं दिसते. मेलबर्नमध्ये दुसरी कसोटी हारल्यानंतर मालिका जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंगलेच आहे. त्यानंतर आता मोहम्मद रिझवानच्या विकेटबाबतचा मुद्दा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसी पुढे ठेवणार असल्याच समजले आहे.

मोहम्मद रिझवानचा वाद -

कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये ३५ धावा करून रिझवान बाद झाला. त्याची विकेट पॅट कमिन्सने घेतली.तरी त्याच्या विकेटवरून खूप वाद झाले आहे. ६१ व्या षटकात कमिन्सने आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान रिझवान खाली बसला पण चेंडू त्याच्या ग्लोव्हजच्या पट्टयाला लागला आणि यष्टीरक्षक अलेक्स कॅरीने त्याच्या झेल घेतला. ऑनफिल्ड अंपायरने रिझवनला नाबाद ठरवले होते.


ऑस्ट्रेलियन खेळाडू अंपायरच्या निर्णयावर नाखूश दिसत होते. त्यामुळे त्यांनी रिव्ह्यू घेतला. दरम्यान रिझवान त्याच्या हाताला स्पर्श करत होता. तो जणू काही म्हणत होता, चेंडू त्याच्या बॅट किंवा ग्लोव्हजला कसलाही स्पर्श न करता यष्टीरक्षकाने झेलला आहे. परंतु तिसऱ्या पंचांनी रिप्ले बघितल्यानंतर सत्य घटना पुढे आली. चेंडू रिझवानच्या ग्लोव्हजच्या पट्टयाला स्पर्श करून गेला होता. त्यामुळे तिसऱ्या अंपायरने त्याला बाद ठरवले होते. रिप्लेत स्पष्टपणे बाद असल्याचे दिसूनही पाकिस्तानी चाहते तो निर्णय चुकीचा असल्याचे म्हणताना दिसत आहे. त्यामुळे थर्ड अंपायरच्या विरोधात पाकिस्तानी चाहत्यांनकडून सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट करण्यात आल्या आहेत.