![]() |
क्विन्स गार्डन मधील सरकारी निवस्थानाची अत्यंत दयनीय अवस्था |
पुणे : सार्वजनिक बांधकाम खात्याची (PWD) निवस्थाने असलेले क्विन्स गार्डन पुरंदर वसाहतीतील (Goverment quarter's) सरकारी कर्मचारी संदीप साठे यांचा प्लॅटची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेली 17 वर्षांपासून हे कुटुंब गळके स्लॅप, कित्येक वर्षे पेंटिंग नाही, भगदाड पडलेल्या भींती, तर कुठे दरवाजे लागत नाहीत कड्या गंजलेल्या, खिडक्या तुटलेल्या आणि लाईटीचे फिटिंग वाळविणे कुजलेली अशा स्थितीत राहत आहे. रुमचे लाईटीचे बोर्ड तुटलेले, टॉयलेट, बाथरूम गळक्या अस्थेत आहेत तेथे किडे लागले आहे. ठेकेदार ही आपलीच मनमानी करत आहे कामे अर्धवट करतात आणि पुन्हा काम त्यांना सांगितल्यास ते दुरुस्ती करून देण्यास मनाई करतात. बाजूला कचऱ्याचा ढीग त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
अनेकदा IB अतिथीगृहात असलेले निवस्थानांची दूरुस्ती कार्यालयात अमित इंगळे यांच्याकडे रूमच्या सर्व दूरुस्ती संबंधित तक्रार करूनही काढी मात्र काम होत नाही. तर इलेक्ट्रिक कामाशी संबंधित तक्रार प्रिया खाडे यांच्याकडे करून देखील लाईटची फिटिंग केली जात नाही. विशेष म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना देखील सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबंधित अधिकारी काम करून देत नाही. तक्रार दिली की दोन- तीन आठवड्याने तेवढे पाहण्यासाठी येतात आणि काम करून देतो म्हणून निघून जातात.पुन्हा दुरुस्तीच्या तक्रारीसाठी पायपीट करावी लागते. त्यानंतर मात्र एकादे छोटेसे दुरुस्तीचे काम करून, बाकीचे पुढच्या आठवड्यात करू म्हणून वर्षानुवर्षे पडूनच राहते. प्लॅटच्या दुरावस्थेने अक्षरश या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांची मागणी आहे की त्यांच्या प्लॅटचे रखडलेले दुरुस्तीचे सर्व कामे उत्तमरित्या आणि लवकरात - लवकर करून दयावीत.
त्या कुटुंबातील सदस्य दत्तात्रय म्हणाले की, आम्ही येथे १७ वर्षे झाली राहतोय, आमच्या बिल्डिंगमधील इतर लोकांची दुरुस्तीचे काम पटापट होतात. पण आम्ही सांगितले तर आमचं काम वाऱ्यावर सोडलं जात. आम्ही देखील सरकारी कर्मचारी आहोत मग हा दुजाभाव का? केला जातोय. भाडे व मेंटनन्स पगारातून कट होऊन जातो. मग त्याबदल्यात आम्हाला दुरुस्तीचे काम का करून दिले जात नाही? चांगल्या रूम मध्ये राहण्याचा अधिकार आम्हाला नाही का? आम्ही चार भावंडे म्हणजे फक्त मुलेच राहत असल्याने जाणूनबुजून रूमच्या दुरुस्तीचे कामे करून दिले जात नाहीत.
◆ पोस्ट ऑफिस (GDS) भरतीची July-2024 महाराष्ट्रातील 2nd Shortlisted Candidates List
पाहण्यासाठी येथे क्लिक करा.