Do these settings in mobile : सुखाची झोप घेण्यासाठी मोबाईलची सेटिंग्स करा !

TEAM BRIEFNEWSBOOK
By -



Do these settings in mobile - पूर्ण झोप न होणे ठरू शकते धोकादायक, झोपण्या अगोदर मोबाईलवर वेळ घालवत असाल तर हे उपाय करा आणि सुखाची झोप घेत जा.

मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे. पण मोबाईलमुळे बऱ्याचदा झोपेत व्यत्यय येतो आणि त्यामुळे तुमची पूर्ण झोप होत नाही. झोप पूर्ण होत नाही आणि त्याचा डोळ्यांना त्रास होतो. तो त्रास होऊ नये म्हणून काही टिप्स आहे. त्याचा तुम्ही वापर करणे योग्य ठरेल. सोशल

मीडिया वरील अँप, साईट्सवर स्क्रोल करणे, ऑनलाइन अजून एकादा लेख वाचने, मित्राच्या मॅसेजला उत्तर देणे, गेमची शेवटची लेव्हल पूर्ण करणे असे बरेच कार्य आपण मोबाईलवर करत असतो. झोपण्या अगोदर मोबाईल वापरणे खरोखर चांगले नाही. तरी देखील तसे करणे थांबत नाही. पुढे काही टिप्स आहे ज्यांच्या मदतीने तुमचा मोबाईल यापुढे तुमच्या झोपेत अडथळा आणू शकणार नाही.


डु नॉट डिस्टर्ब -

तुमच्या मोबाईलमुळे तुम्ही जास्त विचलित होणार नाही याची खात्री करणे ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मोबाईलवर विशेष 'डोंट डिस्टर्ब' किंवा 'स्लिप' फंक्शन्स वापरणे. जवळजवळ सर्व मोबाईलमध्ये ते फीचर असते. ते तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही त्या गोष्टीची काळजी घेते. जेव्हा तुम्हाला अनेक नोटिफिकेशन मिळत नाही, तेव्हाच तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे विचलित होणार नाही. तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या सेटिंग्ज चालू करू शकता. जेव्हा झोपायला जाण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही अशी सेटिंग्ज फोनमध्ये करणे योग्य ठरते आणि तुमची झोप व्यवस्थित पूर्ण होते.


जास्त ब्राइटनेस -

जर तुम्ही रात्री मोबाईल स्क्रोल कर असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की तुमचे डोळे कधीतरी दुखू लागतात. ते तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरून येणाऱ्या प्रकाशामुळे होते. तो प्रकाश खरोखरच तुमची झोप उडावू शकतो. जेव्हा तुमचे डोळे प्रकाशाच्या संपर्कात येतात. तेव्हा तुमची झोप आणि जागण्याची स्थिती खराब करू शकते. परिणामी रात्री जागे राहणे. मोबाईलमध्ये (ब्राइटनेस) प्रकाश फिल्टर करण्यासाठी सेटिंग सुद्धा आहे.

नाइट मोड -

तुमच्या स्क्रीनवरून येणारा कमी करण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या स्क्रीनची चमक कमी करणे. त्यामुळे जेव्हा सूर्य मावळतो आणि घराबाहेर अंधार असतो तेव्हा मोबाईलमध्ये ते फीचर ऑन होईल. मोबाईलच्या सेटिंगमध्ये हे बदल तुम्हाला करता येतील. डोळ्यांना त्रास होऊ नये आणि नंतर शांत झोप घेण्यासाठी ते फीचर उपयोगी पडेल.