![]() |
फ्रान्सिस स्कॉट पूल जहाजेच्या धडकेने पडला |
सिंगापूरचा झेंडा असलेले हे जहाज श्रीलंकेची राजधानी कोलंबोला जात होते. त्याचे नाव दाली असे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सात लोकांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूल पडल्याने पुलावरचे सर्व वाहने देखील पाण्यात बुडाल्या आहे. मात्र, अजूनही हे स्पष्ट झाले नाही की त्या पुलावर किती लोकं होती आणि ते आता कोणत्या परिस्थितीत आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मैरीलैंड ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटीने सांगितले की पुलावर या घटनेनंतर सर्व लेन बंद करून त्यावरील जाणारे ट्रॅफीक थांबवले आहे. जहाज ९४८ फूट लांब होते. फ्रान्सिसच्या पुलाला १९९७ ला पेटाप्सको नदीवर बांधले आहे. त्याच नाव अमेरिकेच्या राष्ट्रगीत लिहिलेल्या ' फ्रान्सिस स्कॉट ' यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते.
जहाजावरील क्रू सुरक्षित, धडकेचे कारण अद्याप समोर आले नाही
दाली जहाजाचे मालकी हक्क असलेल्या कंपनीने सांगितले की, जहाजावरील दोन पायलटसह पूर्ण क्रू सुरक्षित आहे. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. जहाज आणि पूल यांच्या धडकेचे कारण अजूनही समोर आले नाही. जहाजाचे मालिक आणि अधिकारी त्या घटनेचा तपास करत आहे.
न्युयॉर्क टाईम्सच्या म्हणण्यानुसार, बाल्टिमोर हार्बरमध्ये पाण्याचे तापमान ९ डिग्री सेल्सियस आहे. तर अमेरिकेच्या सेंटर फॉर डीसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, १२ डिग्री सेल्सियसच्या कमी तापमान झाल्यावर शरीराचे टेम्परेचर पण वेगाने कमी होते. त्यामुळे पाण्यात बुडालेल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे.
बाल्टिमोरवरून गेल्या वर्षी ६.६७ लाख करोडचे सामान गेले
मैरीलैंड सरकारच्या वेबसाईटवर असे म्हटले की, मागच्या वर्षी बाल्टिमोर पोर्टच्या जवळून ५.२ करोड टन असलेल आंतरराष्ट्रीय कार्गो (समान) गेले होते. त्याची किंमत ६.६७ लाख करोड होती. त्या रिपोर्टनुसार १५ हजार पैक्षा जास्त लोकांना डायरेक्ट नोकरी मिळालेली आहे. तर दुसरीकडे त्याच कारणामुळे मैरीलैंडमध्येही साधारण १.३९ लाख लोकांचे त्यावर रोजीरोटी चालू आहे.