Rohit Pawar - धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील रूम नंबर - 102 मध्ये एकूणच 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी पहाटे चार वाजता या रक्कमेची मोजणी पूर्ण झाली. ही रक्कम विधिमंडळाच्या अंदाज समितीतील आमदारांना 'मलिदा' देण्यासाठी गोळा करण्यात आली होती, असा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा गट) नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
या प्रकरणाची सर्व राज्यभर चर्चा सुरू आहे. दरम्यान या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत लिहिले की, एखाद्या चांगल्या कामगिरीसाठी रोख रकमेचं बक्षीस दिले जाते, धुळ्यात गेलेल्या अंदाज समितीनेही अशी काही दैदिप्यमान कामगिरी केली असेल का? आणि म्हणून त्यांना ‘बक्षिस’ देण्यासाठी कोट्यवधी रुपये रक्कम जमा केले असतील का? हा संशोधनाचा विषय आहे. पण अवकाळी पावसाप्रमाणे आमदार अनिल गोटे त्या रूम नंबर - १०२ खोलीत अचानक हजर झाले आणि त्यांच्यामुळे अंदाज समितीच्या ‘दैदिप्यमान कामगिरी’वर आणि ‘बक्षिस’ म्हणून मिळणाऱ्या रक्कमेवर देखील पाणी फेरले. गेले.