Exam २०२४ - विद्यार्थ्यांसाठी ( student ) जानेवारी ( January ) महिना महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांत नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अभियांत्रिकी (Engineering), वैद्यकीय (Medical) आणि फार्मसी (Pharmacy) यासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनेक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी जानेवारी २०२४ ला सुरू होणार आहे. जेईई (JEE) मेन सेशन-१ ची परीक्षा २४ जानेवारीला सुरू होणार आहे. जेईई मेनसाठी नोंदणी याआधीच झाली आहे. तर CUET PG-२०२४ साठी नोंदणी प्रक्रिया २६ डिसेंबर २०२३ ला सुरू झाली आहे. जानेवारीत ज्या परीक्षांसाठी नोंदणी सुरू होणार आहे, त्यांची पूर्ण माहिती येथून जाणून घ्या.
महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा - (MHT-CET)
महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा (MHT-CET) द्वारे केले जातात. MHT-CET २०२४ परीक्षेसाठी नोंदणी जानेवारी महिन्यात सुरू होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. MHT-CET २०२४ परीक्षा १६ एप्रिल ते ५ मे २०२४ या दरम्यान घेतल्या जातील. अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org या संकेतस्थळवर भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घ्या.
NEET UG २०२४
NEET UG ही पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. त्याद्वारे एमबीबीएस (MBBS) आणि बिडीएस (BDS) यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. NEET UG NTA द्वारे ही परीक्षा आयोजित केली जाते. NEET UG २०२४ ची परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या शेवटी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही NEET UG २०२४ neet.nta.nic.in संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
CUET UG २०२४
केंद्रीय विद्यापीठ आणि अन्य राज्य विद्यापीठांमधील प्रवेश कॉमन युनिव्हर्सिटी इंट्रन्स टेस्ट अंडरग्रॅज्युएट CUET २०२४ परीक्षा १५ मे ते ३१ मे २०२४ दरम्यान होईल. त्याची नोंदणी प्रक्रिया जानेवरीमध्येच सुरू होणार आहे.