सकाळी ९:२० वाजता सेन्सेक्स २२८ अंकांच्या वाढीसह ७२,२६६ अंकांवर व्यवहार करत होता.निफ्टी ५० निर्देशांक ८० पेक्षा जास्त अंकांनी भक्कम होता आणि २१,७३५ अंकांच्या जवळ दिसत होता.सुरुवातीच्या व्यवहारामध्ये जवळपास सर्वच मोठ्या समभागांत वाढ झाली.सेन्सेक्समध्ये ३० पैकी २५ समभाग भक्कम राहिले.JSW स्टील सर्वात जास्त १.२५ टक्क्यांनी वाढला होता.एनटीपीसी,बजाज फिनसर्व्ह,पावर ग्रिड कॉर्पोरेशन यांच्या सारखे शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते.तर दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट,एशियन पेंट्स,इन्फोसिस,अक्सिस बँक हे सुरुवातीच्या सत्रामध्ये रेड झोनमध्ये होते.
गुरुवारी शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारमध्ये गौतम अदानी समूहाच्या ९ पैकी ५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती.मात्र ४ शेअर्स संथ गतीने काम करत होते. गौतम अदानी ग्रुपचे एनडिटीव्ही,अदानी टोटल गॅस,अदानी पावर,अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स कमी होते तर अंबुजा सिमेंट,अदानी एनर्जी सोल्यूशन,एसीसी,अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते.
बुधवारी सेन्सेक्सने एकदा ७२,११९.८५ अंकांची पातळी गाठली होती.त्याचबरोबर निफ्टी ५० ने व्यवहारादरम्यान २१,६७५.७५ अंकांची टेकडी गाठली होती.त्याअगोदर मंगळवारी सुद्धा बाजारामध्ये तेजी दिसत होती.मंगळवारी सेन्सेक्स २२९.८४ अंकांनी म्हणजे ०.३२ टक्क्यांनी वधारला होता.मात्र निफ्टी ९१.९५ अंकांनी अर्थात ०.४३ टक्क्यांनी वधारला होता.