एका झटक्यामध्ये १७ टक्क्यांपर्यंत वाढले Sula Vineyards चा शेअर वर्षभराच्या उच्चांकी स्थानावर आहे. २२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटना अगोदरच पर्यटकांची शहरामध्ये गर्दी वाढू लागली आहे. त्याचा परिणाम हॉटेल्स ट्रेन आणि विमान भाड्यावरही होऊ लागला आहे. १९ जानेवारीचे मुंबई ते अयोध्येचे तिकीट तपासल्यावर इंडिगो प्लाइटचे भाडे २०,७०० दाखवले जात आहे. २० जानेवारीच्या विमान प्रवासाचे भाडे देखील सुमारे २० हजार रुपये झाल्याचे दिसत आहे. जवळजवळ सगळ्याच विमान कंपन्यांची अशी अवस्था आहे.
फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्येमध्ये जाणारे विमानभाडे हे इतर आंतरराष्ट्रीय मार्गांवरच्या भाड्यापेक्षा जास्त झाले आहे. १९ जानेवरीच्याच मुंबई ते सिंगापूरच्या प्लाइटची तपासणी केली तर, एअर इंडियाच्या प्लाइटचे भाडे १०,९८७ रुपये दाखवले जात आहे. त्याबरोबरच १९ जानेवारीला मुंबई ते बँकॉक विमानांचे भाडे १३ हजार ८०० रुपये आहे.
अयोध्येमधील राम मंदिराच्या उद्घाटना अगोदरच नवीन विमानतळ तयार झाले आहे. त्या विमान तळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या विमानतळाचे उद्घाटन केले आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस आणि इंडिगो या दोनच विमान कंपन्यांनी अयोध्येसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येमध्ये अनेक प्रकारच्या व्यावसायिक कामांची उलाढाल दिसून येत आहे. आगामी काळात संभाव्य मागणी मोठ्या प्रमाणावर पर्यटन बाजारपेठ त्या दृष्टीने अनेक कंपन्या तयारी करत आहे. हॉस्पिटॅलिटी फर्म ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी आठवड्या अगोदर म्हटले होते की, लोकं अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स शोधत आहे.