Twitter Logo: Elon Musk ने का केली Doge ची निवड ; ट्विटरच्या लोगोत बदल

TEAM BRIEFNEWSBOOK
By -


 

नवी दिल्ली - ट्विटर ची (Twitter) मायक्रोसॉफ्ट - ब्लॉगिंग साइट थोडी वेगळी दिसायला लागली आहे, त्याचे कारण ट्विटरचा पक्षी उडून गेलाय. आता त्याच्या ऐवजी Dog येऊन बसलाय. ट्विटरने त्यांचा 'ब्लू बर्ड' लोगो बदलून 'डोग्ज' चा लोगो केला आहे. मात्र, हा कुत्रा कोण आहे आणि मस्कने ट्विटर लोगो म्हणून हा कुत्रा का निवडला? असे अनेक प्रश्न लोकांना पडले असतील. अजून एक महत्वाचा म्हणजे एलॉन मस्क (Elon Musk) यांनी हा निर्णय का घेतला?


खर म्हणजे हा 'डॉग्जकॉइन' क्रिप्टोकरन्सीचा आयकॉनही आहे. एलॉन मस्क 'डॉग्जकॉइन' च्या समर्थकांपैकी एक आहे. मिम्समध्ये हा डॉग्ज तुम्ही अनेकदा पाहिला असेल. मस्क यांनी  फेब्रुवारीमध्येच लोगो बदलण्याचे संकेत दिले होते. त्यांनी ट्विटरवर बॉस म्हणून 'डॉग्ज' चा फोटो शेअर केला आणि नवा सीईओ उत्तम असल्याचे लिहिले होते. तेव्हापासून या बाबत अंदाज वक्त होतं होता. मात्र, ट्विटरवर अजून मोठे बदल पाहायला मिळतील अशी अटकळ देखील बांधली जात होती. आता ते प्रत्येक्षात आले असून ट्विटरचा नवा लोगो अपडेट झाला आहे.


डॉग्ज काबोसू जपानमधील सकुरामध्ये राहतो
ट्विटरचा लोगो बदलल्यानंतर 'डॉग्जकॉइन' ने ट्विटरवरून या कुत्र्याचे नाव कासोबू असल्याचे सांगितले. तो जपानमधील साकुरा येथे मालक उत्सुको सातोसोबत राहतो.उत्सुकोने २०१० मध्ये तिच्या ब्लॉगवर काबोसूचे फोटो शेअर केले होते.नंतर बिटकॉइन सारख्या वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सींवर मजा घेण्यासाठी त्याची चित्रे मिम्समध्ये वापरली गेली.तो एक रेस्क्यू डॉग आहे, असे डॉग्जकॉइनने सांगितले आहे.






हा निर्णय एलॉन मस्कने का घेतला ?
या बदला संदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, मस्कचे एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यामध्ये त्यांनी ट्विटर विकत घेण्यापूर्वी युजरला ट्विटर विकत घेण्याचे आणि लोगो बदलण्याचे आश्वासन दिले होते. या ट्विटरवर मस्क यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.





एवढेच नाही तर मस्क यांनी ट्विटरवर एम मीम देखील शेअर केले होते. त्यामध्ये एक डॉग कार चालवताना दिसत आहे, आणि एक पोलीस अधिकारी त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सकडे बघत आहे, मात्र ड्रायव्हिंग लायसन्सवर डॉगच्या फोटोऐवजी ब्लु-बर्डचा फोटो आहे.





आज सकाळी जेव्हा लोकांनी अचानक ट्विटरचा लोगो बदललेला पाहिला, तेव्हा लोकांना असे वाटले की ट्विटर हॅक झाले आहे. परंतु नंतर एलॉन मस्क आणि डॉग्जकॉइन क्रिप्टोकरन्सीच्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विट्सने हे सिद्ध केले आहे, की आता ट्विटरचा लोगो कायमचा बदलला आहे.