Apple ने ios १७.४ रोलआउट फक्त दोन आठवड्यांनी नवीन ios व्हर्जन लॉन्च केले, त्यात नवीन काय असेल ते जाणून घ्या

TEAM BRIEFNEWSBOOK
By -

Apple चे नवीन ios 17.4.1 लॉन्च

Apple New ios version launch : ऍपलने ios १७.४ ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च केल्यानंतर लगेच दोन आठवड्यात गुरुवारी ios १७.४.१ या ऑपरेटिंग सिस्टीमचे नवीन व्हर्जन जारी केले आहे. मागील ऑपरेटिंग सिस्टीमने पॉडकास्टमध्ये चोरी केलेले डिव्हाईस सुरक्षा आणि ट्रान्सस्क्रिप्ट यासारखी वैशिष्ट्ये त्यात दिली होती.

मात्र नवीन अपडेट सिस्टममध्ये विविध सुरक्षा सुधारणा आणि दोष निराकरण सिस्टमचा समावेश आहे. त्यामुळे वापरकर्ते सेटिंग्ज > जनरल > सॉफ्टवेअर अपडेटवर नेव्हीगेट करून आणि अपडेट नाऊ वर टॅप करून नवीन अपडेट डाउनलोड करू शकतात. ऍपल सर्व वापरकर्त्यांसाठी या नवीन अपडेटची शिफारस त्याच्या महत्वपूर्ण बग फिक्स आणि सुरक्षा धोरणांमुळे करतो.





ऍपलने त्याच्या अधिकृत घोषणेत म्हटले की, ' हे अपडेट महत्वपूर्ण बग निराकरणे आणि सुरक्षा अद्यातने प्रदान करते आणि सर्व वापरकर्त्यांसाठी ही शिफारस केली जात आहे.' त्या अपडेटद्वारे संबंधित केलेल्या समस्यांचे तपशील Apple कडून उघड केले नाहीत. काही कंपन्या अद्यातनानंतर रिलीज नोट्स आणि कॉमन व्हल्नेरेबिलिटी अँड एक्सपोजर (CVE) नोंदी प्रकाशित करते. पण यावेळी ही माहिती उपलब्ध करून दिली नाही. Apple ने हा नोट लवकरच बाजारात येणार असल्याचे सांगितले आहे.


ios,iPadOS १७.४.१ डिव्हाईस

नवीन अपडेट iPhone XS आणि नंतरच्या सर्व iPhone साठी उपलब्ध आहे. डिव्हाईसवर अवलंबून आद्यतन आकार ३५० GB ते ४५० GB पर्यंत असू शकतो असा त्यांनी दावा केला आहे. कंपनी iPadOS १७.४.१ देखील लॉन्च करणार आहे. जो iPad pro - १२.९ इंच Second जनरेशन आणि नंतरच्या iPad pro - १०.५ इंच आणि ipad pro - ११ इंच फस्ट जनरेशन आणि त्यानंतरसाठी उपलब्ध असणार आहे. हे अपडेट ipad Air ३rd जनरेशन आणि नंतरच्या ipad ६th जनरेशन आणि त्याच्यानंतरसाठी आहे. तसेच ipad Mini ५th जनरेशन आणि नंतरच्या आवृत्तीवर सुद्धा येणार आहे.





तसेच जुन्या iphones आणि ipads ला देखील नवीन १६.७.७ अपडेट मिळणार आहे. ios १६.७.७, iphone ८, iphone ८ Plus, iphone X वर आणले जाणार आहे. तर ipadOS १६.७.७ हे ipad ५th जनरेशन, ipad pro - ९.७ इंच आणि ipad pro - १२.९ इंच फस्ट जनरेशनवर आणले जाणार आहे.

स्मार्टफोन 5G तुम्हाला परवडणाऱ्या किमतीमध्ये मग कसली वाट पाहाताय लवकर Amazon वरून खरेदीसाठी येथे क्लिक करा.