Auto News : आता प्रतीक्षा संपली, बहुचर्चित असलेली BYD Seal EV भारतात आज झाले लॉन्च जाणून घ्या कारचे सर्व अपडेट्स

TEAM BRIEFNEWSBOOK
By -

BYD Seal EV कार भारतात लॉन्च

Auto News BYD Seal : प्रसिध्द कार उत्पादन कंपनी BYD भातात आपले तिसरे मॉडेल लवकरच लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहे. नवीन लॉन्च केले जाणारे हे मॉडेल एवढे आकर्षक आहे की, ग्राहकांनी त्या कारसाठी बुकींग देखील सुरू केली आहे. बीवायडीच्या त्या मॉडेलबद्दल भारतीय बाजारपेठेमध्ये मोठी क्रेझ BYD चे नवीन मॉडेल BYD Seal ५ मार्च म्हणजे आज भारतामध्ये लॉन्च झाले आहे. २०२३ ला झालेल्या ऑटो एक्स्पोत बीवायडी सील पहिल्यांदाच उघड झाली. तर आता ती भारतामध्ये लॉन्च देखील झाली आहे.

बीवायडीचे वैशिष्ट्ये (BYD Seal EV Features)

BYD Seal EV ने भारतीय भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश केला आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्या कारमध्ये ८२.५ kwh क्षमतेचा पॅक जोडण्यात आला आहे. त्या शिवाय, मागील एक्मलध्ये २३०hp/३६०nm चुंबक सिंक्रोनस मोटर ही जोडली गेली आहे. ती कार एका चार्जिंगमध्ये ५७० किमी अंतर कापण्यास सक्षम असणार आहे. त्याचबरोबर ही कार 0 ते १०० किलोमीटर प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त ०.९ सेकंद घेते.


१५०kw चार्जर सोबत बीवायडी सीलला १० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी साधारण ३७ मिनिटे लागतात. त्याच दरम्यान नियमित ११kw AC चार्जरसोबत बॅटरी ० ते १०० टक्के चार्जिंग करण्यासाठी ८ तास लागू शकतात.


बीवायडी सीलची एक्स-शोरूम प्राईज (BYD Seal EV Price)

BYD सील ५० लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह भातामध्ये उतरली आहे. BYD Seal EV चे दोन मॉडेल्सची नावे बीवायडी E6 Electric MPV ची एक्स-शोरूम किंमत २९.१५ लाख रुपये आहे. तर बीवायडी ATTO 3 Electric Suv ची एक्स-शोरूम किंमत ३३.९९ लाख रुपये आहे.


बीवायडी सीलचे डिझाईन 

बीवायडी सील EV ची रचना फारच आकर्षक आणि युनिक आहे. त्या कारमध्ये कुपसारखे सर्व काचेचे छप्पर, फ्लॅश फिटिंग डोअरचे हँडल, स्प्लिट हेडलँम्प डिझाईन आणि चार बुमरँग आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाईट्स सुद्धा आहे. त्यामुळे ग्राहकांना या कारचा नवा लूक नक्कीच आवडू शकतो.


बीवायडी कोणाशी स्पर्धा करणार

BYD कार ही थेट Hyundai Ioniq 5 सोबत स्पर्धा करण्यास सज्ज झाली आहे. तर Hyundai Ionia 5 ची किंमत साधारण ४६.०५ लाख रुपये भारतात आहे.


5G स्मार्टफोन तुमच्या खिश्याला परवडणाऱ्या Price मध्ये मिळणार Amazon च्या नव्या offer मध्ये तर मग वाट कसली पाहताय लवकर खरेदी करा, खरेदीसाठी येथे क्लिक करा .