![]() |
मनसेची बैठक न झाल्याने पदाधिकाऱ्यांची तारांबळ |
पुणे - पुणे दौरा सोडून ताबडतोब मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मुंबईला पुन्हा रवाना झाले. पुण्यामध्ये काल विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीला पदाधिकारी उशिरा पोहचल्यामुळे राज ठाकरे यांना राग अनावर झाला त्यामुळे ते परत माघारी परतले आहे. या बैठकीचे आयोजन साधारण २ वाजता करण्यात आले होते. पुण्यामधील नवी पेठेमधील कार्यालयात ही बैठक होणार होती. तर पदाधिकारी वेळेत उपस्थित नसल्याचे पाहताच राज ठाकरे यांचा राग अनावर झाला त्यामुळे ते पुन्हा मुंबईकडे निघून गेले.
राज ठाकरे बैठक न घेताच निघून गेले ?
मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पण विभाग प्रमुखांची बैठक न घेताच राज ठाकरे नवी पेठेमधील पक्ष कार्यालयातून निघून गेले आहे. पदाधिकाऱ्यांची बैठकीची वेळ सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. परंतु , नंतर ती वेळ बदलून २ करण्यात आली होती. दोन ते सव्वादोन वाजता पक्ष विभागप्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्यालयामध्ये बोलवण्यात आले होते. राज ठाकरेही सव्वादोन वाजता पक्ष कार्यालयात पोहचले होते. परंतु, त्या शहरातील कार्यालयामध्ये मुख्य पदाधिकारी उपस्थित नव्हते. तर ज्यांना बैठकीला बोलावलं होतं ते विभागप्रमुख देखील पोहचले नव्हते. लोकसभेच्या पाश्वभूमीवर शहरातील विधानसभेच्या प्रत्येक प्रमुखाला त्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. या सगळ्यांशी राज ठाकरे लोकसभा निवडणूकीसंदर्भात चर्चा करणार होते. त्यामुळे मनसेच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण होती. पण सव्वातीन वाजता राज ठाकरे अचानक ही बैठक सोडून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.
पुणे मनसे पदाधिकाऱ्यांची तारांबळ
राज ठाकरे काल सव्वा दोन वाजता पक्ष कार्यालयात आले त्यावेळी पक्ष कार्यालयामध्ये कोणी पदाधिकारी उपस्थित नव्हते. राज ठाकरे आले असल्याचे माहिती मिळताच सगळ्या पदाधिकारी आणि विभाग प्रमुखांची मोठी तारांबळ झाली होती. शहरामधील वेगवेगळ्या भागातील पदाधिकारी कार्यालयापर्यंत कसेबसे पोहचले होते. मात्र तोपर्यंत राज ठाकरे यांचा राग अनावर झाला. ठाकरे कार्यालयामध्ये तासभर थांबले पण त्यांनी बोलावलेल्या बैठकीवर कसल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. असे पदाधिकाऱ्यांची स्पष्ट सांगितले आहे. पुढच्या निवडणूकीची काय रचना असेल ? निवडणूक कशी पार पडणार ? या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तर यावर राज ठाकरे यांनी कोणाशीही याबाबत कोणतीच चर्चा केली नाही. पदाधिकाऱ्यांसोबत ते बसून होत आणि सव्वा तीनला ते ताबडतोब त्या कार्यालयामधून बाहेर पडले आणि थेट मुंबईकडे रवाना झाले. पण आता पुढे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार का ? आणि राज ठाकरे नेमके पदाधिकाऱ्यांशी काय बोलले याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट मिळाली नाही.