Sanjay Raut in Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळे खोटारडे, संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

TEAM BRIEFNEWSBOOK
By -
संजय राऊतांची शिर्डीतून युतीवर जोरदार टीकास्त्र

शिर्डी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) काहीही बोलतील त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका. ते सगळे मनोरुग्ण आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळे एकजात खोटारडे आहे, अशी धारदार टीका ठाकरे गडाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. संजय राऊत सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर असून साईबाबांचे दर्शन दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शिर्डीमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला.


ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज (दि.२ मार्च) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी दौऱ्याच्यावेळी लोणी गावामधील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधक असलेल्या प्रभाताई घोगरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली होती. लोणी येथे जाण्यापूर्वी त्यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. तर दर्शनानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपापासून ते बारामतीमधील झालेल्या रोजगार मेळाव्यावरही भाष्य केले होते.


महाविकास आधाडीत वंचीतचा समावेश

संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली आहे. त्यावर आता कोणी देखील पुन्हा बैठक घेणार नाही. याचा अर्थ जागावाटपाचे निर्णय झालेले आहे. वंचीतने जागांचा प्रस्ताव दिलाय, त्याच्यावर प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तर त्यांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतलेच आहे. लवकरच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत प्रकाश आंबेडकर यांची बैठक होणार आहे, असेही पुढे संजय राऊत बोलले.


शिर्डीची जागा शिवसेनेकडे

शिर्डीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (शिवसेना) नेहमी जिंकत राहिला आहे. तर आमच्या पक्षाने येथे प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे. चर्चेमध्ये प्रत्येक पक्ष जागा मागत असतो. कार्यकर्त्यांचा आग्रह असतो मात्र पुढे जायचं असते. फडणवीसांनी आत्मचिंतन केले पाहिजे कोणी कोणाचा विश्वासघात केला ते, फडणवीस आज जे बोलतात तोच विश्वासघात आहे. तर २०१४ मध्ये कोणी युती तोडली ? यानंतर मातोश्रीवर कोण निमंत्रण घेऊन आलं, असा प्रश्न राऊतांनी केला. काल निधीवरून एका मंत्र्याने मार देखील खाल्ला आहे. सुदैव आहे इथल्या पालकमंत्री यांच्यावर ती वेळ आली नाही.


पवारांचा गड ते बाजी मारणारच

सरकार राज्याचे आहे कुणा एका पक्षाचे नाही. मोदींनी वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. सरकार कोणतेही असो त्यांनी जर हा याप्रश्नी निर्णय घेतला तर त्याचे स्वागत केलंच पाहिजे. राजकीय लढाया एका बाजूला ठेवल्या पाहिजे. परंतु, जर कोणी आश्वासनांची पूर्तता करत असेल तर त्याचे स्वागत आहे. ज्या बारामतीमध्ये शरद पवारांनी अनेक उद्योग आणून रोजगार दिला. तिथे रोजगार मेळावा होतोय. तर तिथं तुम्ही राजकारणासाठी मेळावा घेताय. बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला आहे तो ते गाजवणारच, असं संजय राऊत म्हणाले आहे.