![]() |
दीपिकाने इंस्टाग्रामवर दिली चाहत्यांना गुडन्यूज |
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहे. दीपिकाने सोशल मीडियावर त्यासंबंधित पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. दीपिकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने सप्टेंबर २०२४ असे लिहिले आहे. त्या पोस्टखाली तिने तिचे आणि रणवीरचे नाव देखील लिहिले आहे. तसेच पोस्टमध्ये लहान बाळाचे कपडे आणि सोबत खेळण्यांचे चित्रही काढलेले आहे. दीपिकाची ती पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. त्यांच्या या गुडन्यूजमुळे चाहत्यांबरोबर बॉलीवूड मध्यल्या अनेक मंडळींनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.
' गोलियों की रासलीला राम-लीला ' चित्रपटापासून रणवीर आणि दीपिकाची लव्हस्टोरी सुरू झाली आहे. त्या चित्रपटामध्ये दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. मात्र, त्यानंतर दोघे ' बाजीराव-मस्तानी ' आणि ' पद्मावत ' या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका आणि रणवीर १४ नोव्हेंबर २०१८ ला लग्नाच्या बंधनात अडकले. इटलीमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्यासाठी आयोजन करण्यात आले होते. तर त्याआधी म्हणजे २०१५ ला दीपिका आणि रणवीरने गुपचूप साखरपुडा देखील केला होता. याचा खुलासा रणवीरने एक कार्यक्रमाच्या मुलाखतीमध्ये केला होता.
दीपिका आणि रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २०२३ वर्ष दीपिका आणि रणवीरसाठी खुप महत्त्वाचे ठरले आहे. गेल्यावर्षी दीपिकाचे प्रदर्शित चित्रपट ' पठाण ' आणि ' जवान ' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तर रणवीरचा ' रॉकी और राणी की प्रेमकहाणी ' चित्रपट देखील हिट झाला होता. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ' फायटर ' चित्रपटामध्ये दीपिका झळकली होती. त्या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर ऋतिक रोशनची मुख्य भूमिका होती. तर दीपिकाचा ' क्लिक २८९८ एडी ' हा आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ' सिंघम अगेन ' चित्रपट लवकरच लवकरच प्रशकांच्या भेटीला येणार आहेत.