![]() |
पाकव्याप्त पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी मरियम नवाझ |
Nawaz sharif's Daughter Chif-Minister of pak's Panjab : पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ (PML-N) च्या वरिष्ठ नेत्या आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ सोमवारी पंजाब प्रांताच्या निवडून आलेल्या देशामधील पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (PTI) समर्थीत सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (SIC) च्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वॉकआउट केल्यामुळे मरियम (५०) ने मुख्यमंत्री पदाची निवडणूक जिंकली आहे.
मरियम म्हणाल्या की, वडील ज्या पदावर बसायचे त्या पदावर बसून मलाही आनंद झाला. तर महिला मुख्यमंत्री झाल्यामुळे लोकांना देखील आनंद वाटत आहे.
राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त होणार
मरियम यांना २२० मते मिळाली आहे, पिटीआय समर्थीत सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (SIC) च्या राणा आफताबचा त्यांनी पराभव केला आहे. मरियम आता राजकीयदृष्टया महत्त्वाच्या पाक-पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताची एकूण लोकसंख्या १२ कोटी आहे.
मी बदला नाही घेणार
तुरुंगात जाण्यासारख्या अवघड प्रसंगातून मी गेली आहे, मात्र मला कठोर बनवल्याबद्दल मी माझ्या विरोधकांचे आभारीच आहे. पण मी त्या घडलेल्या सर्व गोष्टींचा कोणत्याही प्रकारे बदला घेणार नाही, असे त्या म्हणाल्या आहे. पुढे त्यांनी त्या मागे असणाऱ्यांचा उल्लेख देखील केला आहे. त्यातुन अप्रत्यक्षपणे मरियम यांनी माजी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि पाकिस्तानमधील माजी सरन्यायाधीश साकीब निसार यांच्यवर निशाणा साधला आहे.