![]() |
| मराठी भाषा गौरव दिन |
कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१३ ला महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मात्र, याच दिवसाला अनेक जण ' मराठी राज्यभाषा दिवस ' असे देखील म्हणतात. तर मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राज्यभाषा दिवस हे दोन्ही वेगवेगळे आहे.
महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने १० एप्रिल १९९७ मध्ये काढलेल्या परिपत्रिकेत १ मे हा मराठी राज्यभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहे. तसेही तो दिवस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून १ मे ला साजरा करण्यात येतो. पण कालांतराने तो विस्मृतीत गेला आहे. यामुळे शासनाला पुन्हा एकदा परिपत्रक काढावे लागले होते. त्यामुळे आज मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर १ मे ला मराठी राज्यभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्राला लाभलेले रत्न कुसुमाग्रज
महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज याचे मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर असे आहे. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिकमध्ये २७ फेब्रुवारी १९१२ ला झाला आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यातील शिरवाडे हे त्यांचे जन्म गाव आहे. कुसुमाग्रज यांच्या मोठ्या बहिणीचे नाव कुसुम होते, त्या नावावरूनच त्यांनी कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरले आहे. शिरवाडकर यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीतून जागतिक दर्जाचे लेखन केले आहे.
आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून सरकारने त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय २१ जानेवारी २०१३ मध्ये घेण्यात आला आहे. तेव्हापासूनच २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषेसाठी मोलाचे योगदान
मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा जास्त काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. प्रामाणिक सामाजिक आस्था आणि क्रांतिकारक वृत्ती तसेच शब्द कलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहे. त्याच्यामधल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरामधील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमहत्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्याच्यामधल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्येक्ष ईश्वरासंबंधी प्रश उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करण्यास प्रवृत्त केले होते. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमहत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रुपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.
कुसुमाग्रज यांचे प्रसिद्ध कविता संग्रह
१) अक्षरबाग, २) किनारा, ३) चाफा, ४) छंदोमयी, ५) जाईचा कुंज, ६) जीवन लहरी, ७) थांब सहेली, ८) पांथेय, ९) प्रवासी पक्षी, १०) मराठी माती ही कुसुमाग्रज यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहे. तर अथेल्लो, आनंद, आमचं नाव बाबुराव, एक होती वाघीण, किमयागार, कैकेयी, नटसम्राट ही त्यांची अतिशय गाजलेली नाटके आहे. कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णव या कादंबऱ्या देखील कुसुमाग्रज यांनी लिहिल्या आहेत.
● 5G चा स्मार्टफोन चांगला रॅम आणि बॅटरी बॅकपही तसेच उच्च दर्जेचा कॅमेरा, महत्वाचे म्हणजे कमी किंमतीत मिळतो Amezon वर offer चालू आहेत. या लिंक वरून खरेदी केल्यास तुम्हाला 10% सूट मिळणार खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा .

