![]() |
रेल्वे RPF ची भरती एप्रिलमध्ये होणार सुरू |
आरपीएफ २०२४ भरती
भारतीय रेल्वे बोर्ड तर्फे रेल्वे सुरक्षा बल (RPF) साठी जवळपास ४६६० जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. तर आरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी ४२०८ उमेदवार भरले जाणार आहे. सब-इंस्पेक्टर पदांसासाठी ४ ५२ जागा भरले जाणार आहे.
वयाची अट काय असणार
आरपीएफच्या सब-इंस्पेक्टर पदांसाठी आवेदन करणाऱ्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी वयोमर्यादा २० वर्षांपासून1 ते २८ पर्यंत मर्यादित केली आहे. तर आरपीएफच्या कॉन्स्टेबल पदासाठी इच्छुकांसाठी ही वयोमर्यादा १८ वर्षांपासून ते २८ वर्षे अशी मर्यादित अट ठेवली आहे.
शैक्षणिक पात्रता
आरपीएफ भरती २०२४ कॉन्स्टेबल पदासाठी इच्छुक उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थामधून निधान १० वी पास असावा. मात्र, सब-इंस्पेक्टर पदासाठी इच्छुक उमेदवार हा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थामधून कोणतीही ग्रॅज्युएट डिग्री मिळवलेला असावा.
वेतनश्रेणी काय असणार
रेल्वे भरती पोलीसमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी वेतनश्रेणी २१,७०० आणि भत्ता मिळणार आहे. तर आरपीएफच्या सब-इंस्पेक्टर (SI) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी ३५,४०० आणि भत्ता दिला जाणार आहे.
आरपीएफ कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया
१) कंप्युटरवर MCQ प्रश्नांवर आधारित टेस्ट होणार (CBT)
२) शारीरिक परीक्षा (PET) आणि शारीरिक मापण (PMT) परीक्षा घेतली जाणार
३) कागदपत्रे स्त्यापन
४) वैद्यकीय तपासणी