Paytm Crisis : पेटीएम बँकेतून पैसे कसे काढता येतील? १५ मार्चच्या नंतर काय बदल होणार? RBI ने जारी केली यावरच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

TEAM BRIEFNEWSBOOK
By -


मुंबई - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) ठेवी घेण्यास बंदी घातल्याच्या नंतर पेटीएम यूपीआय वापरणाऱ्या गग्राहकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. पेटीएम बँकेवर घातलेल्या बंदीनंतर पेटीएम वरून स्कॅनिंग करून (UPI) पैसे पाठवता येतील का?

पेटीएमद्वारे पैसे ट्रान्सफर करता येणार आहे का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे स्व:ता आरबीआयने (RBI Released FAQ) दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने FAQ जारी केले आहे.

पेटीएम बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना पडलेल्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांनी FAQ जारी केले आहे. त्यामध्ये ग्राहकांच्या सर्व समस्येचे निराकरण आरबीआयने केले आहे. त्या FAQ द्वारे UPI, IMPS आणि NCMC कार्डच्या संबंधित प्रश्नांवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.


पेटीएम बँकेशी संबंधित FAQ पुढीलप्रमाणे आहेत

१) मी १५ मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यामध्ये UPI आणि IMPS करू शकतो का?

उत्तर - नाही, तुम्ही १५ मार्च नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करू शकणार नाही.

२) मी १५ मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यामधून UPI आणि IMPS च्या सहाय्याने पैसे काढू शकतो का?

उत्तर - होय, तुम्ही तुमच्या खात्यामधून पैसे काढू शकता.

३) मी पेटीएम पेमेंट बँक खाते वापरून १५ मार्च नंतर भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) च्या सहाय्याने पेमेंट करू शकता का?

उत्तर - होय, तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात जमा केलेले पैसे बिल भरण्यासाठी वापरू शकता.मात्र तुम्ही तुमच्या खात्यामध्ये किंवा वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकणार नाही. यामुळे १५ मार्चपूर्वी बीबीपीएस साठी इतर कोणतेही बँक खाते वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.

४) मी आधार कार्डच्या सहाय्याने बायोमेट्रिक पेमेंट सिस्टम (AePS प्रमाणीकरण) वापरून १५ मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यामधून पैसे काढू शकतो का?

उत्तर - होय, तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात जमा केलेले पैसे या प्रणालीच्या सहाय्याने काढू शकता.

५) माझ्याकडे पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) आहे. मी १५ मार्च नंतर देखील वापरू शकतो का?

उत्तर - होय, तुम्ही मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरू शकता. मात्र १५ मार्च नंतर तुम्ही ते टॉप अप करू शकणार नाही. यामुळे गैरसोय टाळण्यासाठी इतर कोणत्याही बँकेने जारी केलेले कार्ड वापरा.

६) माझ्याकडे पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आहे. १५ मार्च नंतर मी ते टॉप अप किंवा रिचार्ज करू शकतो का?

उत्तर - नाही, तुम्ही १५ मार्च नंतर NCMC कार्ड टॉप अप किंवा रिचार्ज करू शकणार नाही. यामुळे गैरसोय टाळण्यासाठी इतर कोणत्याही बँकेने जारी केलेले कार्ड वापरू शकता.

७) मी पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची शिल्लक इतर कोणत्याही बँकेच्या NCMC कार्डमध्ये हस्तांतरित करू शकतो का?

उत्तर - नाही, NCMC कार्डमध्ये शिल्लक हस्तांतरणाची सुविधा नाही, यामुळे त्यात जमा झालेले पैसे वापरावेत. शिल्लक राहिल्यास तुम्हाला पेटीएम पेमेंट्स बँकेकडून परतवा मागता येणार आहे.


● Salman khan out form no Entry २ : भाईजानचा पत्ता कट ' नो एन्ट्री - २' मधून तर या तीन अभिनेत्यांना मिळणार संधी येथे क्लिक करा.