Salman khan out form no Entry २ : भाईजानचा पत्ता कट ' नो एन्ट्री - २' मधून तर या तीन अभिनेत्यांना मिळणार संधी

TEAM BRIEFNEWSBOOK
By -


 Salman khan out form no Entry २ - बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman khan) याच्या बिग बॉस रियालिटी शोचा महाअंतिम सोहळा आताच पार पडला. त्यादरम्यान भाईजान (Salman Khan) आता एका सिनेमामुळे चर्चेत आला आहे. भाईजानच्या आगामी सिनेमांची यादी फार मोठी आहे. परंतु, ' नो एन्ट्री-२' या सिनेमामधून भाईजानचा पत्ता कट झाला आहे. ' नो एन्ट्री २' मध्ये तुम्हाला नवे कलाकार पहायला मिळणार आहे. यामुळे अभिनेता सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांना न घेण्याचा निर्मात्याने विचार केला आहे.

नो एन्ट्री २ मध्ये कोणाला संधी ?

सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ' नो एन्ट्री ' हा सिनेमा २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. तर नो एन्ट्री २ देखील सलमान खानला कास्ट केले जाईल, असं बोललं जात होतं. त्याऐवजी नव्या ३ कलाकारांना ' नो एन्ट्री २' मध्ये एन्ट्री मिळाली आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, नो एन्ट्री २ मध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ हे तीन नवे चेहरे पहायला मिळणार आहे. निर्मात्याने या तीन कलाकारांशी चर्चाही केली आहे. एवढेच नव्हे तर ते तीन अभिनेते डिसेंबर पासून शूटिंगला सुरुवात देखील करणार आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, निर्मात्याने नो एन्ट्री २ ला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ' नो एन्ट्री २' प्रदर्शित करण्यात विचार केला आहे. दिग्दर्शक म्हणून अनिस बाजमी यांचे नाव समोर आले आहे. तर ' नो एन्ट्री २ स्टार्स आणि शूटिंगबद्दल अधिकृतरित्या कोणतीच माहिती अजून मिळाली नाही.





२० वर्षांपूर्वी नो एन्ट्रीत झळकले होते हे कलाकार -

२० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या नो एन्ट्री या सिनेमाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमामध्ये सलमान, फरदीन खान आणि अनिल कपूर हे प्रमुख भूमिकेत दिसले होते. या स्टार्सशिवाय सेलिना जेटली, लारा दत्ता, इशा देओल आणि बिपाशा बासू यांच्या भूमिका देखील महत्त्वाच्या होत्या. तर नो एन्ट्री २ मध्ये वरुण धवन,अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ यांच्या शिवाय अजून कोणाची एन्ट्री होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बोनी कपूर यांनी केली होती नो एन्ट्रीची निर्मिती -

नो एन्ट्री या सिनेमाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती. मात्र, आता नो एन्ट्री सिक्वेलबाबत त्यांनी तयारी सुरू केले आहे.  पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'नो एन्ट्री २' हा सिनेमा नो एन्ट्री पहिल्यापेक्षाही जबरदस्त बनवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. अनिस बाजमी हे सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहेत.