Sahani Bhatnagar Passes Away : ' दंगलची ' छोटी बबीता सुहानी भटनागरचे निधन,आजाराशी झुंजताना आज घेतला अखेरचा श्वास

TEAM BRIEFNEWSBOOK
By -



Sahani Bhatnagar Passes Away : मनोरंजन जगातून एक वाईट घटना समोर आली आहे. आमीर खानच्या सुपरहिट चित्रपटातील छोटी बबीता फोगाटचा रोल केलेली ऐक्ट्रेसचा १९ व्या वर्षीची असतानाच निधन झाले. जूनियर बबीता फोगाट बनलेल्या ऐक्ट्रेसचे खरे नाव सुहानी भटनागर होते. ती गेले कित्येक दिवसांपासून आजारपणात होती. त्यातच एम्समध्येही तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बरेच प्रयत्न करून देखील डॉक्टर तिला वाचवू शकले नाही; आणि १७ फेब्रुवारीला सकाळी सुहानी भटनागर हीने अखेर शेवटीचा श्वास घेतला.


सुहानी भटनागरच्या निधनाणे तिच्या सर्व कुटूंबाला धक्काच बसला आहे. तिच्या आई-वडिलांवर तर दुःखाचा डोंगरच ओढवला आहे. आधीच्या माहितीनुसार, सुहानीही तिच्या फॅमिलीसोबत फरीदाबादला राहत होती. तर आज शनिवारी सकाळी तिचे दुःखत निधन झाले आहे. रिपोर्टरनुसार, तिच्यावर अत्यसंस्कार अजरोंदा स्वर्ग आश्रममध्ये केले जाणार आहे.


सुहानीची चित्रपट सृष्टीतील जर्नी 

सुहानीने २०१६ वर्षामध्ये अमीर खानच्या चित्रपट ' दंगल ' मधून बॉलीवूड डेब्यू केला होता. तिला गायन आणि डान्सची खूप आवड होती. तिच्या आईचे नाव पूजा भटनागर आहे. डेब्यूच्या अगोदर सुहानीने काही ऐड्स मध्येही काम केले आहे. दंगल चित्रपटातील तिच्या रोलमुळे आणि ऍक्टिंगमुळे तिला खुप प्रसिद्धी मिळाली होती आणि तिचे काम प्रेक्षकांना देखील फार आवडले होते. तिच्या काही डायलॉगवर लोकांनी बऱ्याच शिट्ट्या मारल्या होत्या. पण आता तिने लहान वयातच या दुनियेला अलविदा केलं आहे.


दंगलची कास्ट छोटी बबीता 

दंगलवर बोलायचे झाले तर ही फिल्म नितेश तिवारीने बनवली होती. हा चित्रपट २०१६ ला प्रदर्शित झाला होता. अमीर खानने चित्रपटात पहेलवान महावीर सिंह फोगाट यांचा रोल केला तर साक्षी तंवर यांनी त्यांच्या पत्नीचा रोल केला होता. तर फातिमा सना शेख मोठी मुलगी गीता फोगाट बनली होती तर सुहानी फोगाट मोठी होऊन सान्या मल्होत्रात बदलून जाते जिने यंग बबीताचा रोल प्ले केला होता.