![]() |
टाटा नेक्सॉन एडिशन कार मार्चमध्ये होणार लॉन्च |
Tata Nexon Dark Edition : टाटाची Suv कार आता बाजारात डार्क एडिशनमुळे खूप लोकप्रियतेत आहे. या कारची विक्रीची टक्केवारी पाहता नेक्सॉन (Nexon) हॅरीयर आणि सफारी सारख्या मॉडेल्सच्या विक्रीमध्ये १५-४० टक्के आहे. हॅरीयर आणि सफारी फेसलिफ्ट लॉन्चच्या वेळेस डार्क एडिशन व्हेरियंटसोबत आले होते. मात्र, नवीन नेक्सॉनसाठी ते व्हर्जन उपलब्ध नव्हते. आता काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स् नेक्सॉन डार्क एडिशन (Tata Nexon Dark Edition) मार्चच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च करणार असे सांगण्यात आले आहे. हे व्हर्जन कोणत्या ट्रीमसाठी उपलब्ध असेल त्या बाबत अधिक माहिती जाणून घ्या.
टाटा नेक्सॉन डार्क एडिशन
डार्क एडिशन ट्रीटमेंट नेक्सॉन आणि त्यावरील मिड-स्पेक ट्रीम्सवर उपलब्ध आहे. क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह प्लस, क्रिएटिव्ह प्लस एस, फियरलेस, फायरलेस एस, आणि फियरलेस प्लस एस मध्ये दिले जाणार आहे. हे ट्रीम्स १२०hp, १.२ लीटर टर्बो पेट्रोल किंवा ११५hp, १.५ डिझेलच्या पर्यायासोबत उपलब्ध आहे. ज्यामध्ये ६-स्पीड मॅन्युअल, ६-AMT किंवा ६-DCT गिअरबॉक्स आणि ६-स्पीड MT किंवा AMT चे पर्याय आहे.
नेक्सॉन डार्क एडिशन एक्सटीरियर आणि इंटिरियर सोबत
आताच पार पडलेल्या भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये कंपनीने Nexon EV ची डार्क एडिशन सादर केली होती. जर ते मॉडेल बाजारामध्ये आले तर नेक्सॉन डार्कला ब्लॅक बंपर आणि ग्रील, डार्क रेल आणि मिश्र धातूंसह पूर्णपणे ब्लॅक आउट एक्सटीरियर फिनिश मिळणार आहे. त्याची व्हील्स आणि टाटा लोगो सुद्धा ब्लॅक दिसणार आहे. आतील बाजूस ब्लॅक आउट डॅशबोर्ड, ग्लास ब्लॅक सेंटर कन्सोल, ब्लॅक लेथरेट अपहोल्ट्री आणि ब्लॅक रुफ लाइनर मिळण्याची अपेक्षा आहे. बाकीचे फीचर्स आणि इंटिरियर कसे असणार त्याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट दिली नाही.
नेक्सॉन डार्कमध्ये एलइडी डेटाईम रनिंग लाईट्स, कीलेस गो, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, १०.२५ इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एपल कारप्ले, ३६० डिग्री कॅमेरा, सनरुफ आणि इतर अनेक वैशिष्ट्ये त्यामध्ये उपलब्ध असणार आहे.
डार्क एडिशन मॉडेल्स या सेगमेंटमध्ये फार लोकप्रिय झाले आहे. ब्रेझा, किगर आणि मग्नाइट सारख्या मॉडेल्सना आधीच ब्लॅक एडिशन मिळाले आहे. तर सोनटच्या एक्स-लाइन व्हेरियंट अनोख्या मॅट ग्रे फिनिश सोबत मिळणार आहे.