'अयोध्यात राम मंदिराच्या जागेवर स्मारक किंवा हॉस्पिटल बनवू इच्छिणाऱ्या पैकी काही हिंदू पैकी मी सुद्धा एक होतो. ज्यामुळे आपल्या समाजामध्ये अनेक काळापासून संघर्ष संपतील. मात्र आज त्यासाठी मला स्वतःची लाज वाटत आहे. शांतीसाठी मी धर्म आणि धार्मिकतेचे बलिदान द्यायला निघालो होतो. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या मूल्यांवर मी ठाम राहिलो नाही, त्याबद्दल मला लाज वाटत आहे.' असे रणवीर शौरीने ट्विटरवर म्हटले आहे.
पुढे त्याने म्हटलं की, सत्य आणि न्यायासाठी ही कठीण लढाई लढणाऱ्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मी भगवान राम यांच्याकडे माफी मागतो आणि मला सुध्दबुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो. आपल्या या भूमीवर धर्म कायम राहावा आणि सगळ्या भारतीयांच्या जीवनामध्ये शांती, समृद्धी यावी त्यासाठी मी प्रार्थना करतो. "जय श्री राम" रणवीरच्या त्या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहे. कंगनाने रणवीरचे ते ट्विट लाईक केले आहे. तर अनुपम खैर यांनी 'जय श्री राम' असे लिहिले आहे.