![]() |
वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेकरांची भेट |
आंबेडकरांचा माध्यमांशी संवाद
वसंत मोरे यांच्याशी चर्चा झाली. दुसरी महत्त्वाची चर्चा व्हायची आहे. जे काही अधिकृत बोलायचं आहे, ते ३१ तारखेपर्यंत कळवेन. महाराष्ट्राच्या नवीन राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि कोण - कोण करेल हे अधिकृतपणे ३१ ते २ तारखेपर्यंत सांगितले जाईल. काही चर्चा ओपन करू शकत नाही. कारण आता घडामोडी घडत आहे. राजकीय स्तरावर नाही पण सोशल पातळीवर आणि गावपातळीवर सुरू आहे. त्या चर्चांना एक रुप येण्यासाठी दोन-तीन दिवस जातील. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाच नवे समीकरण समोर येणार आहे. आजची चर्चा त्यादृष्टीने झाली आहे. ग्रामीण आणि शहरी पातळीवर जे काही घडतंय ते दोन - चार दिवसांमध्ये समोर येईल. त्या सर्वांची उत्तरं मिळतील. महाविकास आघाडीकडून आवाहन केले जातंय, पण जे काही होतय त्याबद्दल दोन तारखेपर्यंत थांबा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.
वसंत मोरे माध्यमांशी काय बोलले
आंबेडकर साहेबांशी बैठक सकारात्मक झाली. येणाऱ्या दोन - तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल. तो निर्णय सर्वांना कळवळ जाईल, असे वसंत मोरे म्हणाले. प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्यापूर्वी ' मी लोकसभा निवडणूक लढणार आहे, आणि काहीही झाले तरी मी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे वसंत मोरे म्हणाले होते. यामुळे वसंत मोरे यांना आता वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळतेय का ? ते पाहणे महत्त्वाचे आहे. आता येत्या ३१ मार्च किंवा २ तारखेपर्यंत सर्व स्पष्ट होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीकडे महाराष्ट्रातल्या जनतेचे लक्ष
प्रकाश आंबेडकरांना भेटण्यापूर्वी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांच्या ऑफिसवर जाऊन भेट घेतली होती. ही भेट पुण्यात झाली होती. वंचितने २०१९ मध्येही पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार दिला होता. अनिल जाधव यांना २०१९ मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. तर आताच्या लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. अभिजित वैद्य यांच्या नावाचीच चर्चा आहे. यामुळे येणाऱ्या दिवसात काय होईल आणि वंचितचा उमेदवार कोण असेल ? याकडे पुण्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.