![]() |
CEC राजीव कुमार यांना झेड सुरक्षा |
Loksabha Election 2024 - इंटेलिजेन्स ब्युरोने (IB) दिलेला थ्रेट परसेप्शन बाबतचा रिपोर्ट हा मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या बाबतचा आहे. त्यानंतर लगेच गृह मंत्रालयाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा दिली आहे.
टीमसीसह बरेच राजकीय पक्ष आताच्या घडीला गदारोळ करत आहे. त्यामुळे आयबीचा थ्रेट परसेप्शन रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टच्या आधारे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सिक्युरिटी प्रदान करण्यात आलेली आहे.
झेड सुरक्षेमध्ये ३३ सुरक्षगार्ड तैनात करण्यात येतात. आर्मर्ड फोर्सचे १० आर्मर्ड स्टॅटिक गार्ड व्हीआयपीच्या घरी तैनात करण्यात येतात. सहा राऊंड द क्लॉक पीएसओ, तीन शिफ्टमधी बारा आर्मर्ड स्कॉर्ट कमांडो, दोन वाचर्स आणि तीन ड्रायव्हर सुरक्षेसाठी दिलेले असतात.
देशात आता सार्वोत्रिक लोकसभा निवडणूकीचा महोत्सव सुरू झाला आहे. सात टप्प्यांमध्ये यंदाची निवडणूक पार पडणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी सुरू होईल, तिसरा टप्पा हा ७ मे ला असणार, चौथा टप्पा १३ ला सुरू होणार, पाचवा टप्पा २० मे रोजी होईल, सहावा टप्पा २५ मे ला आणि सातवा टप्पा हा अखेरचा १ जून ला संपन्न होईल. मात्र सर्व टप्प्यांमधील मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.
देशाचा निवडणूक आयोग संविधानाच्या परिशिष्ट ३२४ मधील प्रावधनांनुसार देशाच्या राष्ट्रपतींद्वारा नियुक्त केला जातो. त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्त यांचा सहभाग असतो.
भारताचा निवडणूक आयोग हा १९५० रोजी गठीत झाला होता. तेव्हापासून १५ ऑक्टोबर १९८९ पर्यंत आयोगमध्ये फक्त मुख्य निवडणूक आयुक्त हे एकच पद होते. परंतु यानंतर १६ ऑक्टोबर १९८९ पासून १ जानेवारी १९९० पर्यंत तीन सदस्यीय आयोगाची नेमणूक करण्यात आली होती.