लोकसभा निवडणुकीत भाजपने मारली बाजी, गुजरातमध्ये सुरत जिंकण्यात भाजपला यश

TEAM BRIEFNEWSBOOK
By -

सुरतमध्ये बिनविरोध भाजप विजयी

 Lok Sabha Election 2024 - भारतभर लोकसभा निवडणुकीचे वातावरण पसरलेले असताना गुजरातमध्ये ' बीजेपी ' ने विजयाचे खात यशस्वीपणे उघडलं आहे. सुरतची जागा बिनविरोध जिंकण्यात भारतीय जनता (BJP) पक्षाला यश आले असून, भाजप पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) यांचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खर म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध खासदार म्हणून निवड झाली आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडून घोषणा केली जाणार आहे. सुरत येथील काँग्रेसचे (Congress) उमेदवार नीलेश कुंभानी (Nilesh Kumbhani) यांचा अर्ज रद्द झाल्यामुळे तेथील राजकीय समीकरणे बदलली होती. त्यानंतर बसपाचे (BSP) उमेदवार प्यारेलाल भारती (Pyarelal Bharti) यांनी अर्ज मागे घेतल्याने भारतीय जनता पक्षाच्या विजयात पहिली भर पडली आहे.


बिनविरोध निवड झालेले मुकेश दलाल हे गुजरातमधील भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जात आहे. सुरतच्या जागेवरून प्रथमच एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे त्यांचा विजय आता निश्चित झाला आहे. दलाल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा निवडणूक आयोग लवकरच करेल. मात्र गुजरातच्या २५ जागांसाठी ७ मे ला मतदान होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली आहे. परंतु सध्यातरी कोणतीही अपडेट समोर आली नाही. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असताना मुकेश दलाल विजयी झाले आहे.




तर मागच्या वेळी गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ जागा जिंकण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले होते. काँग्रेसला तेव्हा एकही जागा जिंकता आली नव्हती. सुरतमध्ये काँग्रेसचे उमेदवार कुंभानी आणि इतर उमेदवारांचे अर्ज रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चलबिचल उसळली आहे. यानंतर मुकेश दलाल बिनविरोध निवडून येतील अशीही चर्चा सुरू होती. तरीदेखील दलाल हे प्रचारात व्यस्त राहिले होते. बिनविरोध विजयी होण्याच्या प्रश्नावर त्यांनी ७ मे पर्यंत जनतेमध्ये राहून प्रचार करणार आहे असं म्हटले आहे.


मुकेश दलाल हे सुरत भारतीय जनता पक्षाचे महासचिव असून ते सुरत महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष देखील होते. यापूर्वी युवा मोर्चाचे राज्यस्तरावर काम केले आहे. मुकेश दलाल हे तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा स्थायी समिती अध्यक्ष राहिले असून गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांचे जवळीक असणारे नेते अशीही त्यांची ओळख होती.

One plus Smartphone 5G And Beautiful Colors क्लिक करा.