अयोध्येत प्राणप्रतिष्ठेपूर्वी अभेद किल्ला, ड्रोनचा पहारा १० हजारपेक्षा जास्त CCTV आणि ७ लेअरची सुरक्षा व्यवस्था

TEAM BRIEFNEWSBOOK
By -


 
उत्तर प्रदेश - राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठे अगोदर अयोध्येला  अभेद किल्ल्याचे स्वरूप आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी  जवळपास ८ हजार व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार आहे. तर ड्रोनच्या मदतीने तेथील सिक्योरीटी मॉनिटरिंग होणार आहे. येथे १० हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे इंस्टॉल केले आहे. ते जागो-जागी लक्ष ठेवणार आहे. चला तर मगं जाणून घेऊ कशी असेल अयोध्यमधील सुरक्षा व्यवस्था.

सात लेअरची सुरक्षा व्यवस्था -

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावेळी आयोध्येमध्ये अचूक सुरक्षा व्यवस्था रहावी त्यासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या सुरक्षा यंत्रणांनी एकत्रपणे सात लेअरची सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. त्याच्या पहिल्या लेअरमध्ये एसपीजी (SPG) कमांडो असणार, त्याच्या जवळ अत्याधुनिक शस्त्रे असणार आहे. तर दुसऱ्या लेअरमध्ये एनएसजी (NSG) चे जवान असणार आहे. तिसऱ्या लेअरमध्ये आयपीएस (IPS) अधिकारी सुरक्षेमधील जबाबदारी पार पडणार आहे. चौथ्या लेअरची जबाबदारी ही सीआरपीएफ (CRPF) जवाणांकडे असणार आहे. पाचव्या लेअरमध्ये उत्तर प्रदेश एटीएसचे (ATS) कमांडर असणार आहे. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये अँक्शनमोडमधी तयार असणार आहे. सहाव्या लेअरमध्ये आयबी (IB) आणि सातव्या लेअरमध्ये स्थानिक पोलिसांची फौज असणार आहे.



पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था अशी असणार -

सर्वात जास्त सुरक्षितता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नियोजित करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा लेअरमध्ये तीन DIG, १७ SP, ४० ASP, ८२ DSP आणि ९० इन्स्पेक्टर्स बरोबर १ हजारपेक्षा अधिक कॉन्स्टेबल तसेच चार कंपनी पीएससी तैनात असणार आहे. तर येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी १० हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहे. ज्या लोकांच्या दुकानांसमोर आणि घरांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आले आहे, त्यांनाही पोलीस कंट्रोलरूम सोबत जोडण्यात आले आहे.

अँटी ड्रोन सिस्टीमही सज्ज -

सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून कार्यक्रमादरम्यान कुठल्याही हवाई कारवाई हल्ल्यापासून सुरक्षिततेसाठी ड्रोनविरोधी यंत्रणांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजेंसने सुसज्ज अशा कमांड कंट्रोल सिस्टीम तयार करण्यात आल्या आहे. त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना एसपी प्रवीण रंजन यांनी सांगितले की, राम मंदिराच्या सुरक्षिततेसाठी सीआरपीएफच्या सहा कंपन्या, पीएसीच्या तीन कंपन्या, एसएसएफच्या नऊ कंपन्या आणि एटीएस आणि एटीएफची प्रत्येक एक तुकडी २४ तास तैनात असणार आहे.




स्नायपर्सही असणार तैनात -

त्याचबरोबर, ३०० पोलीस, ४७ अग्निशमन दलाचे कर्मचारी, ४० रेडिओ पोलीस कर्मचारी, ३७ स्थानिक गुप्तचर, २ बॉम्ब शोधक पथके आणि २ अँटी सबोटाज पथके तैनात करण्यात आली आहे. त्यांना केवळ कार्यक्रमाच्या ठिकाणीच नाही तर मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर आणि चौकांवर देखील तैनात केले जाणार आहे. जेणेकरून कोणतीही घुसखोरी रोखता येईल. प्रत्येकावर नजर ठेवली जात आहे आणि संशयास्पद दिसणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जात आहे, असे देखील रंजन यांनी सांगितले. त्याशिवाय स्नायपर्सही सज्ज असणार आहे.