X-Man फेम अभिनेत्याचं ४२ व्या वर्षी कॅन्सरने निधन, हॉलिवूडवर शोककळा परसली

TEAM BRIEFNEWSBOOK
By -



एक्स-मॅन फेम अभिनेता अदन कैंटो यांचा कॅन्सरने निधन झाले आहे. तो ४२ वर्षांचा होता. मागच्या काही दिवसांपासून तो कॅन्सरशी लढत होता. अदन कैंटो अपेंडिक्स (appendiceal) कॅन्सरने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. मात्र शेवटी ८ जानेवारीला त्याची झुंज संपली आहे. कैंटोच्या निधनानंतर हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना खूप मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


कैंटोने अनेक सुपरहिट हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. खरं तर 'द क्लिनिंग लेडी' या टीव्ही सीरिजमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. द क्लिनिंग लेडी या सिरीजच्या २ सीझनमध्ये त्यानं काम केले होते. परंतु कॅन्सरमुळे या सिरीजच्या तिसऱ्या सीझनसाठी त्याला काम करणे शक्य झाले नाही. सध्या द क्लिनिंग लेडी सिरीजच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग चालू आहे.


अभिनेत्या बरोबर कैंटो गायक, गिटारिस्ट आणि दिग्दर्शक देखील होता. त्याने गीतकार म्हणून सिनेइंडस्ट्रीमधील करिअरला सुरुवात केली होती. अनेक मेक्सिकन टीव्ही शो आणि चित्रपटांसाठी त्याने गाणीही लिहिली होती. २००९ साली त्याला टीव्ही मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे अनेक टीव्ही मालिकांमध्ये कैंटो दिसला होता. २०१४ ला प्रदर्शित झालेल्या X-Man या हॉलिवूड चित्रपटामुळे अदन कैंटोला प्रसिध्दी मिळाली होता. त्या सिनेमामध्ये त्याने सुपरहिरोची भूमिका साकारली होती. कैंटोच्या मागे त्याची पत्नी २ मुलं असा परिवार आहे. त्याचा दुसरा मुलगा फक्त २ वर्षांचा आहे. कैंटोच्या निधनाने त्याच्या मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले आहे.