Oscer २०२४ : ऑस्कर सोहळ्यात मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना आदरांजली,हॉलिवूडसह बॉलिवूडमधील दिगज्जांनाही मानवंदना !

TEAM BRIEFNEWSBOOK
By -

ऑस्करमध्ये नितीन देसाई यांना मानवंदना

Oscar 96th Academy Awards - चित्रपट विश्वामधील सर्वोच्च आणि मनाचा समजला जाणारा ऑस्कर सोहळ्याचे आयोजन कॅलिफोर्निया मधील डॉल्बी थिएटरमध्ये करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार बहाल करण्यात येतो. तर ९६व्या अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एकाही भारतीय सिनेमाने खात उघडलं नाही. मात्र तरी देखील या अवॉर्ड सोहळ्याने भारतीयांचे त्याकडे लक्ष आकर्षित केले आहे.

ऑस्कर २०२४ मधील सोहळ्यात मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांना आदरांजली दिली आहे. दरवर्षीप्रमाणे अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये ' मेमोरियम ' या सत्रामध्ये कलाविश्वात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिवंगत कलावंतांना स्मरण करून, त्या सर्वांना आदरांजली देण्यात येते. त्यामुळे यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये भारतीय कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांना देखील कळविश्वातील योगदानासाठी मानवंदना दिली आहे. नितीन देसाई यांच्यासह फ्रेंड्स स्टार मॅथ्यू पेरी, अभिनेत्री चिता रिवेरा, अभिनेता रयान, कॉमेडीयन रिचर्ड लेविस, टिना टर्नर आणि इतरही कलाकारांना स्मरून आदरांजली देण्यात आली आहे.


बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट २०२३ रोजी एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या करून आपले जीवन संपवलं होत. त्यांनी ' लगान ' , ' स्लमडॉग मिलेनियर ' , ' हम दिल दे चूके सनम ' , ' बाजीराव मस्तानी ' , ' देवदास ' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिगदर्शन केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्काच बसला होता. नितीन देसाई याचे कलादिग्दर्शन असलेल्या ' लगान ' या चित्रपटाला २००२ सालात सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालेले होते.


परंतु यावर्षीच्या ऑस्करमध्ये ओपनहायमर, बार्बी आणि पुअर थिंग्ज या चित्रपटांना सर्वाधिक नामांकन मिळाली आहे. तर ऑस्कर २०२४ यावर्षात ' ओपनहायमर ' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या यादीत किलीयन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. ओपनहायमरचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. तर यावर्षाच्या ऑस्करमध्ये इमा स्टोन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. पुअर थिंग्ज मधील अभिनयासाठी इमा स्टोन हिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.